Raigad Accident News :  मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa National Highway) भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. महाडकडून पुण्याच्या दिशेला जाणारी भरधाव  वॅगन आर कार थेट  कंटेनरच्या खाली घुसल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये कारमधील एका वैद्यकीय अधिकारी महिलेचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर प्रियांका भास्कर आहेर (वय वर्ष 35 राहणार लातूर) अस मृत महिलेच नाव आहे. 

Continues below advertisement

या अपघातात कार चालक गंभीर जखमी, उपचार सुरु

मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa National Highway) लाखपाले गावाजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. तर या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे. चालकाला उपचारासाठी महाडमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसापासूनसातत्यानं मुंबई गोवा महामार्गावर अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघात होण्यास विविध कारणे  आहे. अनेकांचे अपघात हेवेगावर नियंत्रण न राहिल्याने होत आहेत. तसेच काही अपघात चालकांच्या हलगर्जीपणामुळं देखील होतायेत.

विविध कारणांमुळं अपघातांचं प्रमाण वाढलं

वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरावस्था, अनियंत्रीत वेग यामुळं रायग़ड जिल्ह्यातील रस्त मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जानेवरी 2025 ते जून 2025 या काळात रायगड जिल्ह्यात जवळपास 335 अपघात झाले आहेत. यामध्ये 136 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 413 जण जखमी झाले आहेत. 

Continues below advertisement

मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची दुरावस्था झाली आहे

रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई पुणे जुना महामार्ग हे तीन प्रमुख महामार्ग आहेत. या व्यतिरीक्त जिल्हाभरात विविध महामार्ग आणि राज्यमार्ग जिल्हामार्गाचे जाळे आहे. या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक दिसून येत आहे. त्यामुळं अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे, वळण रस्ते चालकांच्या लक्षात येत नाहीत, त्यामुळं अपघात घडत आहेत.

काम सुरु असताना ज्या उपाययोजना करणे गरजेचे

मुंबई गोवा महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. काम सुरु असताना ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. ठेकेदार किंवा महामार्ग विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका प्रवाशांना बसत असल्याचे नागरिकांनी म्हटलं आहे. अनेकदा अपघात होतात, अनेकांचे बळी जातात. 

महत्वाच्या बातम्या:

Mumbai Accident: रस्ता क्रॉस करताना भरधाव बाईकनं उडवलं, तरुणानं जागेवर जीव सोडला, मुंबईत अपघाताचा थरार