Solapur : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे समर्थक शरणू हांडे (Sharanu Hande ) याचं अपहरण करणारा मुख्य आरोपी अमित सुरवसेने (Amit Suravase)  प्रथमच एबीपी माझावर प्रतिक्रिया दिली आहे. मला या प्रकरणामध्ये गोवले जात असून, मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन माझी बाजू मांडणार असल्याची माहिती अमित सुरवसेने दिली आहे.आज मुख्य आरोपी अमित सुरवसे सह सातही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आरोपींना जेलमध्ये नेण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर सर्व आरोपींना जेलमध्ये नेण्यात आले 

माझ्यावर केलेले सगळे आरोप खोटे असल्याची माहिती देखील आरोपी अमित सुरवसेने दिली आहे. मी याबाबत सगळं समोरासमोर बोलणार असल्याचे सुरवसे म्हणाला. मी या सगळ्या विषयासंदर्भात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती अमित सरवसेनं दिली आहे. 

7 आरोपींना न्यायालयीन कोठडी

दरम्यान, आज आमदार गोपीचंद पडळकर समर्थक शरण हांडे अपहरण प्रकरणी सातही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अमित सुरवसे आणि श्रीकांत सुरपुरे यांची पोलिस कोठडी मागण्यात आली होती. मारहाण करुन व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा राग मनात धरुन आरोपी अमित सुरवसे यांनी शरणू हांडेचे अपहरण केले होते. पोलिसांनी 7 पैकी 2 आरोपींची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने सातही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

फिल्मी स्टाईल केलं होतं शरणू हांडे यांचे अपहरण

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्यातं फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याची घटना समोर आली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही आहे. अपहरणची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांचे 4 पथक तात्काळ शोधासाठी रवाना करण्यात आले होती. शरणु हांडे (Gopichand Padalkar Worker Sharnu Hande) असे अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचे नाव आहेत. तर अमित सुरवसे असे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या कार्यकर्त्याची भेट पडळकर यांनी घेतली, यावेळी कार्यकर्त्यांने काय घडलं याबाबतची माहिती त्यांना दिली. यावेळी त्यांनी रोहित पवारांचं देखील नाव घेतलं आहे. दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. शरणू हंडे यांची भेट घेतल्यानंतर या हल्ल्याचे मास्टरमाइंड आमदार रोहित पवार असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला होता. 

महत्वाच्या बातम्या:

Solapur Crime News: शरणू हांडे अपहरण प्रकरणात आणखी दोघांना कर्नाटकातील इंडी भागातून घेतलं ताब्यात; गुन्ह्यातील सहभाग...