Raigad Accident News :  रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा ताम्हिणी घाट हा महत्वाचा दुवा समजला जातो. मात्र, या घाटात एक भीषण अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील 6 तरुण आपली नवीन थार घेऊन कोकणात फिरण्यासाठी निघाले होते. मात्र मंगळवारी पहाटे या तरुणांची थार कार घाटातील एका 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली होती. यामधील 4 जणांचे मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलं आहे. उर्वरित दोघांचा शोध अजूनही सुरु आहे. दरम्यान, नेमका हा अपघात झाला कसा? याबाबतची माहिती पाहुयात. 

Continues below advertisement


वळणाचा अंदाज न आल्यामुळं अपघात


ताम्हिणी घाटातील रस्ता अत्यंत वळणावळणाचा आणि दगडांनी भरलेला आहे. प्राथमिक तपासात, रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्यामुळं चालकाचे नियंत्रण सुटलं असावं, असं दिसून आलं आहे. या दुर्घटनेमुळे घाटातील सुरक्षित वाहनचालनाची गरज अधोरेखित झाली आहे. पोलीस या अपघाताचा सखोल तपास करत आहेत. मृतांची ओळख निश्चित करणे, अपघाताचे नेमके कारण शोधणे आणि इतर कोणत्याही संभाव्य प्रवाशांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.


या घटनेनंतर ताम्हिणी घाटातील प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन 


या घटनेनंतर ताम्हिणी घाटातील प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं असून अपघातप्रवण रस्त्यावर आवश्यक सूचना व सतर्कतेचे उपाय करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. माणगाव पोलीस, SVRSS, शेलार मामा रेस्क्यू टीम आणि RESQ रेस्क्यू पथकांनी अथक प्रयत्नांनी रोप, स्ट्रेचर व क्रेनच्या मदतीने दरीत उतरुन मृतदेह बाहेर काढले आहेत. अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11.30 वाजता हे मित्र थार घेऊन कोकणात निघाले होते


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11.30 वाजता हे मित्र थार कार (एम.एच.12, वायएन 8004) घेऊन कोकणाकडे निघाले होते. मंगळवारी त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे पालकांनी उत्तमनगर पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आली होती.


अपघातातील तरुणांची नावे


1) साहिल गोठे (वय 24) 
2) शिवा माने (वय 20)
3) प्रथम चव्हाण (वय 23) 
4) श्री कोळी (वय 19)
5) ओमकार कोळी (वय 20)
6) पुनीत शेट्टी (वय 21) 


सर्व राहणार पुणे जिह्यातील कोंडवे कोपरे गावातील आहेत.


महत्वाच्या बातम्या:


ताम्हिणी घाट अपघात, दरीत कोसळलेल्या 'थार'मधील सर्व पुण्याचे; 19 ते 22 वर्षाचे पर्यटक युवक ठार, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर