शिर्डी : सर्जिकल स्ट्राईकबद्दल काहीही बोलणं चुकीचं असल्याचं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना घरचा आहेर दिला आहे. निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राईक हा बनाव असल्याचा सनसनाटी आरोप केला होता. 'सर्जिकल स्ट्राइक बद्दल काहीही बोलणे चुकीचं आहे. देशाबाबत अनेक घटना घडतात, मात्र त्याबद्दल नेत्यांनी बोलणं टाळावं' असा सूचक सल्ला विखे-पाटील यांनी दिला. निरुपम काय बोलले हे मला माहित नाही, पण राजकीय नेत्यांनी भाष्य टाळावं, असं विधान विखे-पाटलांनी केलं. मंगळवारी संजय निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राईकबद्दल जोपर्यंत पुरावे मिळत नाही, तोवर संशय कायम राहील, असं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने तातडीनं पुरावे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती.

सर्जिकल स्ट्राईक निव्वळ बनाव, संजय निरुपम यांचा सनसनाटी आरोप

“सर्जिकल स्ट्राईक काँग्रेस सरकारच्या काळातही झाले होते. मात्र, त्याचं कधीच राजकारण केलं नाही. इथे सर्जिकल स्ट्राईकचे पोस्टर लागल्याचे दिसतात.”, अशी टीका निरुपम यांनी केली.