Sharad Pawar on PM Modi : पीएम मोदी यांनी पंडित नेहरुंवर टीका केली, लोकशाही प्रधान राज्य उभं करणाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. व्यक्तीनं घेतलेली धोरणं दुबळी करण्याचा प्रयत्न मोदी करत असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. संविधान हक्क परिषद आयोजित राज्यव्यापी एल्गार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी भाजपचा आणि पीएम मोदींचा चांगलाच समाचार घेतला.


शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे, सावित्रीबाई, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. एकाबाजूला संविधानावर हल्ला तर दुसऱ्या बाजूला शिक्षणावर हल्ला होत आहे. काल काय झालं पुण्यात? ते म्हणाले निर्भय बनो, भीती घालवा हे सांगितलं आणि मांडणी केली तर त्यांचायावर हल्ले होतात, अशी टीका त्यांनी केली. 


मूलभूत अधिकाराचा प्रश्न सोडवण्याचा विचार या राज्यकर्त्यांमध्ये नाही


ते म्हणाले की, पंजाब हरियाणाचे शेतकरी दिल्लीत बसतात. त्यांच्या मूलभूत अधिकाराचा प्रश्न सोडवण्याचा विचार या राज्यकर्त्यांमध्ये नाही. घटनेचं काम त्यांनी केलं. मात्र, बाबासाहेबांनी स्वातंत्र्याआधी देखील काही महत्त्वाचे निर्णय घेतले.  त्या काळात बाबासाहेबांकडे जल आणि विद्युत ही खाती होती आणि कामगार हे खातं होतं. बाबासाहेबांनी पाण्याचे महत्त्व ओळखले आणि पंजाबात भाकरा नांगलसारखे धरण बांधले. पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशातील काही भाग त्यामुळे चांगला झाला, शेतकऱ्यांना फायदा झाला.  धरणाचाच निर्णय घेतला नाही वीज निर्मिती कशी करता येईल याचा देखील निर्णय घेतला. ही वीज कशी नेता येईल आणि वीज मंडळ आणि इतर गोष्टींचा विचार त्यांनी केला.  


त्यांनी पुढे सांगितले की, कष्ट करणाऱ्या कामागारांना अधिकार असला पाहिजे. गिरणी कामगारांनी संप केला आणि राज्य संकटात आलं. कष्टकऱ्यांचे अधिकार बाबासाहेबांनी त्यांना दिले. मजबूत संविधानाची निर्मिती त्यांनी केली, आज ते धोक्यात आलं आहे ही नागरिकांच्या मनात चिंता आहे. 


मुलभूत अधिकाराची घटना जपली पाहिजे


दोन दिवसांपूर्वी संसदेत मोदींनी भाषण केलं. 100 खासदार निवडून आले ते कुठल्याही पक्षाचे नाही. दुसऱ्या जागी जे आलेत त्यांना लष्कराची मदत आहे आणि ते सरकार बनवण्याचे प्रयत्न करत आहेत. बांगलादेशात देखील हुकुमशाहीचं राज्य होतं. ही स्थिती येऊ द्यायची नसेल तर मुलभूत अधिकाराची घटना जपली पाहिजे. दुरदृष्टी असलेला नेता आपल्याकडे जन्माला आला आणि आंबेडकरांनी आपल्याला हे नवीन शस्त्र दिलं. 


संविधान हक्क परिषद आणि शाळांचे खासगीकरण यासाठी तुम्हाला उल्हासनगरला यायचं आहे असं मला सांगितलं.  मला आनंद झाला लोकांना आपल्या भविष्याची चिंता आहे. संविधान म्हणजे काय? आंबेडकरांनी तुम्हा लोकांना मूलभूत अधिकार दिला. तो अधिकार नसता, तर गेल्या काही वर्षात आजूबाजूच्सा देशात काय घडलं हे विसरुन चालणार नाही. श्रीलंकेत हुकुमशाही आली आणि उभारण्यास काही वर्ष लागली. पाकिस्तानात निवडणुका झाल्या आणि सरकार बदलणार की नाही याची खात्री नाही, संविधान मारण्याचे काम पाकिस्तानात झाले, असे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या