बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातल्या बोडखा शिवारात 18 ते 20 फुटांचा अजगर सापडल्यानं खळबळ उडाली. एका रानडुकराच्या पिलाला गिळून सुस्त पडलेल्या या अजगराला वनविभागानं ताब्यात घेत अभयारण्यात सोडून दिलं आहे.
सकाळी अजगर दिसल्यानं गावात एकच दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर तातडीनं वनविभागाला कळवण्यात आलं. मात्र वनविभागाचे अधिकारी येईपर्यंत दुपार उजाडली. तोपर्यंत एका रानडुकराची शिकार करुन हा अजगर सुस्त पडला होता.
वनविभागानं त्याला जेरबंद करुन अंबाबारावा अभयारण्यात सोडून दिलं. संग्रामपूर आणि जळगाव जामोद हे जंगलबहुल क्षेत्र आहे. त्यामुळे या ठिकाणी साप, अजगर या इतर वन्य प्राणी बऱ्याचदा आढळून येतात.