पुणे : सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या हत्येच्या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. सोमवारी (28 जानेवारी) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून त्याची हत्या झाल्याचं पोलिस तपास समोर आलं आहे.

सिद्धार्थ कलवडी (वय 25 वर्ष) असं मृत तरुणाचं नाव आहे. सिद्धार्थ कलवडी आणि आरोपी राहुल सरकारच्या बहिणीमध्ये प्रेमसंबंध होते. हे संबंधांना राहुलचा विरोध होता. याच कारणावरुन राहुलने त्याच्या तीन ते चार साथीदारांसह सिद्धार्थची धारदार कोयत्याने वार करुन हत्या केली.

हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पोबारा केला. पसार झालेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.