Pune  Vadgaon  Nagar Panchayat Election :  राज्यातील 246 नगरपालिका आणि 54 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे (Election) निकाल आज हाती आले आहेत. बहुतांश जागेवर नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. तर, काँग्रेसला 34, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 7 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 8 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने (BJP) 100 पेक्षा जास्त जागांवरील नगरपालिकेत सत्ता काबिज केली असून जवळपास 120 नगराध्यक्ष भाजपचे झाले आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत थरारक निकाल पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता राहुल ढोरे या अवघ्या एका मताने विजयी झाल्या, तर भाजपच्या पूजा आतिष ढोरे यांना एका मताने पराभव स्वीकारावा लागला आहे. 

Continues below advertisement

सुनीता ढोरे यांना 323 मते, तर पूजा ढोरे यांना 322 मते

लोकशाहीत एका मताची ताकद काय असते? याचा अंदाज  पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. कारण या निवडणुकीत  राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता राहुल ढोरे या अवघ्या एका मताने विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या पूजा आतिष ढोरे यांना एका मताने पराभव स्वीकारावा लागला आहे. यानिकालाच्या आकडेवारीनुसार, सुनीता ढोरे यांना 323 मते, तर पूजा ढोरे यांना 322 मते मिळाली. या एका मताच्या फरकाने लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित झाले. सुनीत ढोरे यांच्या विजयानंतर ढोरे कुटुंबीयांसह समर्थकांनी जल्लोष केला.

एका मतालाही लोकशाहीत मोठी किंमत

सामान्य कुटुंबातून आलेल्या सुनीता राहुल ढोरे या एका मताने विजयी झाल्याने, माझ्य  एका मतालाही किंमत आहे हे प्रत्येक मतदाराला पुन्हा एकदा ठामपणे पटले आहे. मावळमध्येच अजय बवर यांचा अवघ्या 2 मतांनी विजय झाला आहे. अजित पवार राष्ट्रवादीकडून ते रिंगणात उभे होते. अजय बवर यांना 393 तर भाजपच्या चंद्रजीत वाघमारे यांना 391 मतं मिळाली. लोकशाहीच्या या उत्सवात एक-एक मत किती मौल्यवान आहे, हे  यानिमित्ताने ठळकपणे अधोरेखित झालं.

Continues below advertisement

चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम, नऊ जागांवर विजय

वडगाव नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अबोली मयूर ढोरे या विजयी झाल्या असून, त्यांनी महायुतीच्या उमेदवार ॲड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांचा 1460 मतांनी पराभव केला. अबोली ढोरे यांना 7795 मते मिळाली. तर म्हाळसकर यांना 6335 मते मिळाली. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्ता कायम राखत नऊ जागांवर विजय मिळवला, तर भाजपने सहा जागा जिंकल्या. तर दोन अपक्ष उमेदवार निवडून आले. निकालानंतर विजयी उमेदवारांनी वडगाव शहरातून भव्य मिरवणूक काढली होती. निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते यांनी विजयी उमेदवारांची घोषणा केली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण निकम उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:

रावसाहेब दानवेंच्या भोकरदनमध्ये शरद पवारांची 'तुतारी' वाजली; पराभवानंतर दानवेंची पहिली प्रतिक्रिया