'एक टक का बघतोस,' जाब विचारल्याने इन्फोसिसच्या इंजिनिअरची हत्या
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 30 Jan 2017 01:28 PM (IST)
पुणे : 'एक टक का बघतोस,' असा जाब विचारल्याच्या रागातून हिंजवडीमधील इन्फोसिसची इंजिनिअर रसिला ओपीची हत्या झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी सुरक्षारक्षक भाबेन सैल्कियाला रसिलाने याबाबत जाब विचारला होता. तसंच वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता. मात्र रागावलेल्या भाबेन तेव्हापासून रसिलाच्या मागे हात धुवून लागला होता. यावरुन दोघांमध्ये वादही झाला होता. रसिला रविवारी सुट्टी असतानाही कामानिमित्त कंपनीत आली होती. पण संध्याकाळपर्यंत ती बाहेर न आल्याने सुरक्षारक्षकांनी शोध घेतला. तेव्हा कार्यालयातच गळ्याला केबल गुंडाळलेल्या अवस्थेत रसिलाचा मृतदेह आढळला.