पुणे : ढेकूण घालवण्यासाठी घरात केलेलं पेस्ट कंट्रोल पुण्यातील दोघा तरुणांच्या जीवावर बेतलं. पेस्ट कंट्रोल केलेल्या रुममध्ये झोपलेले दोन तरुण दुसऱ्या दिवशी मृतावस्थेत आढळले. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
पुण्यातील एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये ते दोघं काम करत होते. कॅन्टीन मालकानेच त्यांना राहण्यासाठी एक खोली दिली होती. या खोलीत ढेकूण झाल्यामुळे तीन दिवसांपूर्वी पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर तीन दिवस ते एका मित्राच्या घरी जाऊन राहिले होते. मंगळवारी रात्री ते परत आपल्या खोलीवर आले होते.
बुधवारी बराच वेळ झाला तरी कामावर न आल्याने कॅन्टीन मॅनेजरने त्यांच्या खोलीवर येऊन पाहिलं. तेव्हा रुमचा दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून पाहिलं असता दोघंही झोपलेले दिसले.
कॅन्टीन मॅनेजरने दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. तपासणीअंती डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी एपीआय सुर्यवंशी अधिक तपास करत आहेत.
पुण्यात दोघा तरुणांचा मृत्यू, तीन दिवसांपूर्वी रुममध्ये पेस्ट कंट्रोल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Mar 2019 10:49 AM (IST)
खोलीत ढेकूण झाल्यामुळे तीन दिवसांपूर्वी पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. त्यामुळे दोघे जण तीन दिवस एका मित्राच्या घरी जाऊन राहिले, मात्र मंगळवारी रात्री ते परत आपल्या खोलीवर आले. बुधवारी सकाळी राहत्या घरी ते मृतावस्थेत आढळले
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -