Pune Traffic : पुण्यात सध्या वाहतूक (Pune Traffic) कोंडीवरुन (pune) मोठ्या प्रमाणात लेटर वॉर सुरु असल्याचं चित्र आहे. वाहतूक कोंडीसाठी पालिका आणि पुणे पोलीस एकमेकांना दोषी ठरवत आहे. पुणेकर देखील वाहतूक कोंडीवरुन रोज संताप व्यक्त करत आहेत. वाहतूक कोंडीसाठी पोलीस किंवा महापालिका नेमका कोणता उपाय शोधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या चर्चांना आता अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शहरातील वाहतुकीच्या वाढत्या समस्येची जबाबदारी नवीन पोलिस उपायुक्तांवर (pune police) सोपवण्यात आली आहे. 


पुण्यात नव्याने नियुक्त झालेल्या पोलीस उपायुक्त आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणार आहे. शहरात अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्या प्रत्येक परिसरातील पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासोबत पाहणी करताना वाहतूक कोंडीची कारणंं शोधून काढावी लागणार आहे. या सगळ्याचा एक अहवाल तयार करावा लागणार आहे आणि तो अहवाल आयुक्तांकडे सादर करावा लागणार आहे. 


संदीप सिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख आणि विजय मगर यांचा नवीन उपायुक्तांमध्ये समावेश आहे. पोलिसांच्या बदल्या झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहू नये किंवा वाहतूक कोंडीसाठी ज्या उपाययोजना आखल्या आहेत. त्याचं योग्य पालन करण्याच्या सूचना उपायुक्तांना देण्यात आल्या आहेत. नवीन अधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच या समस्येवर लक्ष्य केंद्रित करावे, अशी सूचना गुप्ता यांनी केली आहे.


उपायुक्तांना सोबत घेत नवे प्रयोग होणार
शहरातील वाहतूक कोंडीचा विषय दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मागील काही महिन्यापासून यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना पोलिसांकडून किंवा महापालिकेच्या मदतीने केल्या जात आहे. वाहतूक कोंडीचा अहवाल सादर केल्यानंतर वाहतूक कोंडीची नेमकी कारणं समोर येतील. त्यानुसार पुन्हा योजना आखल्या जातील. नव्या उपायुक्तांना सोबत घेत पुण्यात वाहतुकीसंदर्भात नवे प्रयोग देखील करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवसातच पुणेकरांना वाहतुकीपासून मोकळा श्वास घेणार आहेत. 


'वाहतूक कोंडी माझं अपयश'
पुण्यातील वाहतूक कोंडी हे माझं अपयश आहे, असं मत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिवाली निमित्त झालेल्या एका मुलाखतीत मांडलं होतं. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्नासाठी नक्की चांगल्या योजना आखणार असंदेखील ते म्हणाले होते. वाहतूक कोंडी सोडवण्याची धुरा नव्या उपायुक्तांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार का?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.