पुण्यात चार वर्षांचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडला
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2016 10:02 AM (IST)
पुणे : शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात एक चार वर्षांचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडला आहे. सुनील मोरे नावा हा चिमुकला बोअरवेलमध्ये 20 फुटांपर्यंत अडकला आहे. मुलाचे आई-वडील शेतमजूर आहेत. पालक शेतात काम करत असताना, सुनील शेजारीच असलेल्या बोअरवेलजवळ पोहोचला. खेळता खेळता तो बोअरवेलमध्ये पडला. दरम्यान चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.