हेडलाईन्स

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त पैसे बँकेत जमा करणाऱ्या 18 लाख लोकांची माहिती प्राप्तिकर विभागाकडे... अशा लोकांना एसएमएस आणि ईमेलद्वारे नोटीस पाठवणार : हसमुख आधिया, केंद्रीय महसूल सचिव


------------


चक्काजाममुळे लालबाग ते दादर दरम्यान वाहनांच्या रांगा


------------

पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रावादीमध्ये आघाडी होणार नाही, दोन्ही पक्षांकडून अधिकृत घोषणा बाकी

------------

चिंचवडजवळ रुळाला तडे, पुणे-लोणावळा रेल्वे वाहतूक खोळंबली, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व एक्स्प्रेस रखडल्या

------------

1. लातूरमध्ये ऑईल कंपनीतील विषारी वायूमुळे नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, मिल मालकारवर कठोर कारवाईचं पालकमंत्र्यांचं आश्वासन

------------

2. युतीसाठी राज यांनी उद्धवना 7 वेळा फोन केल्यावरही प्रतिसाद नाही, मनसे नेते बाळा नांदगावकरांचा दावा तर उद्धव ठाकरेंनी युतीची शक्यता फेटाळली

------------

3. यूपी विधानसभेच्या आखाड्यात सपा-काँग्रेस आघाडीचं वर्चस्व, 'एबीपी माझा'च्या सर्व्हेंचा अंदाज, मुख्यमंत्रीपदासाठी अखिलेश यादवांना पसंती

------------

4. पुण्यातील आयटी इंजिनियर रसिलाच्या हत्येचं गूढ उकललं, एकटक बघण्याचा जाब विचारल्याने सुरक्षा रक्षकाकडून हत्या, मारेकरी पोलिस कोठडीत

------------

5. 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद नजरकैदेत, मोदी-ट्रम्प यांच्या मित्रत्वाच्या संबंधांमुळे कारवाई झाल्याचा हाफिजचा कांगावा

------------

6. जम्मू काश्मीरच्या मच्छिलमध्ये हिमस्खलनामुळे महाराष्ट्राच्या आणखी तीन जवानांचा मृत्यू, परभणी, सांगली आणि साताऱ्यातील जवान शहीद, महाराष्ट्रावर शोककळा

------------

एबीपी माझा वेब टीम