पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात झाली आहे. खासदार राजू शेट्टी यांनी फुले वाड्यात अभिवादन करुन या यात्रेला सुरुवात केली. पण कृषी आणि पणनमंत्री सदाभाऊ खोत मात्र या यात्रेला उपस्थित नाहीत.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी राजू शेट्टींनी पुणे ते मुंबई पायी चालत आत्मक्लेश यात्रा पूर्ण करणार आहेत. आजपासून सुरु झालेली ही यात्रा नऊ दिवसात मुंबईत पोहोचणार आहे.
नैतिक जबाबदारी म्हणून आत्मक्लेष यात्रा
"फडणवीस सरकारला सत्तेत येऊन तीन वर्ष झाली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी योग्य हमीभाव मिळाला नाही. हमीभावाचा निर्णय घेताना मीही त्यात सहभागी होतो. पण शेतकऱ्यांची फसवणूक झाली. या फसवणुकीत माझाही वाटा आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन मी आत्मक्लेष यात्रा काढली आहे," असं सदाभाऊ खोत म्हणाले.
...हेच शहाणपण आहे : राजू शेट्टी
"दीर्घ काळाच्या प्रवासात, जर काही वाटसरु भटकत असतील, तर त्यांच्यासाठी विचार न करता पुढे जाणं हेच शहाणपण आहे," असं म्हणत राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या अनुपस्थितीवर प्रतिक्रिया दिली.