पुणे : पुण्यात 17 वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला अटक केली असून तो या मुलीच्या मावशीचा नवरा असल्याचे समोर आले आहे. नितीन दामोदर असं आरोपीचं नाव आहे.
सिंहगड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या 48 तासात आरोपीला अटक केली आहे. काल राहत्या घरी 17 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. तिच्यावर अत्याचार करुन जीवे मारण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं होतं.
मयत तरुणी पुण्यातील एका महाविद्यालयात अकरावीत शिकत होती. ती आई, वडील आणि छोट्या भावासह पुण्यात राहत होती. धाकटा भाऊ आठवीत शिकतो. सर्व कुटुंबीय नेहमीप्रमाणे घराबाहेर गेले होते. त्यानंतर पीडित मुलगी दुपारी एक वाजता घरी आली. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिचा भाऊ घरी आला, तेव्हा त्याला बहीण बेडवर निपचित पडल्याचं आढळून आलं होतं. त्याने आई-वडिलांना याविषयी कळवलं होतं.
काकानेच अत्याचार करुन हत्या केली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Dec 2018 11:21 AM (IST)
सिंहगड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या 48 तासात आरोपीला अटक केली आहे. काल राहत्या घरी 17 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. तिच्यावर अत्याचार करुन जीवे मारण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -