रायगड : मराठा आरक्षण हे न्यायालयात टिकणार नाही. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच देशात मंदिर, पुतळे बांधले नाहीत तर मते मिळणार नाहीत. भारिप व एमआयएम युती ही भाजपला फायदेशीर असल्याचे देखील ते म्हणाले.
खोपोली येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले यांनी मराठा आरक्षण, राम मंदिर, भारिप व एमआयएम आघाडीबाबत आपले मत व्यक्त केले. मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का? याबाबत आठवले यांना विचारले असता मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. देशात 75 टक्के आरक्षणाचा कायदा केल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटणार आहे. आमचा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे, असे आठवले म्हणाले.
राम मंदिराची जागा बौद्ध धर्मियांची
राम मंदिाबाबत आठवले यांना विचारले असता, राम मंदिर होणे ही करोडो लोकांची इच्छा आहे व आमचीही आहे. मात्र वादग्रस्त जागेचा निकाल लागेपर्यंत थांबणे गरजेचे आहे. राममंदिर बांधताना मुस्लिम समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे आहे, असे ते म्हणाले. राम मंदिराची जागा ही बौद्ध धर्मियांची असून तेथे बुद्धविहार होते. मात्र सध्या वादग्रस्त जागा असल्याने त्या बदल्यात बौद्ध धर्मियांना दुसरीकडे जागा शासनाने द्यावी, अशी मागणी आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंदिर, पुतळे बांधून विकास होणार का? या प्रश्नावर आठवले यांनी मंदिर, पुतळे उभारले नाहीत तर मते मिळणार नाहीत अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. भारीप व एमआयएम आघाडीबाबत विचारले असता, ही आघाडी भाजप आघाडीला फायदेशीर असल्याची प्रतिक्रिया दिली.
मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही : रामदास आठवले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Dec 2018 10:52 AM (IST)
मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का? याबाबत आठवले यांना विचारले असता मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. देशात 75 टक्के आरक्षणाचा कायदा केल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटणार आहे. आमचा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे, असे आठवले म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -