Pune news : राज्य उत्पादन शुल्काच्या तळेगाव  (crime) दाभाडे विभागाने कारवाई केलेली आहे. पुणे-मुंबई महामार्गावर उर्से गावाच्या हद्दीत सापळा रचून पोलिसांनी ही गोवा (Pune police)  बनावटीची दारु जप्त केली आहे. राज्य उत्पादन शुल्काने कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 62 लाख 68 हजार रुपये किमतीची दारू जप्त केलेली आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या मध्ये गामित सोमवेलभाई सिंगाभाई (वय 25वर्षे),व्यवसाय ट्रक चालक रा- ओटा ता. सोनगड जि. तापी गुजरात, मोहन दिनराम खथात वय 34 वर्षे व्यवसाय-ट्रक क्लिनर रा- रुध्रपुरा ता. हुरडा जि. भिलवाडा, राजस्थान यांना अटक करण्यात आली आहे.


पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनर भरून मद्याचा साठा जप्त करण्यात आला. आंतरराज्य या टोळीचा राज्य उत्पादन शुल्काने हा पर्दाफाश केला. उर्से टोल नाक्यावर यासाठी शुक्रवारी सापळा रचला होता. त्यावेळी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अवजड वाहनांची तपासणी करण्यात आली. तेव्हा एका कंटेनरमध्ये आठशे बॉक्स आढळले. त्यात  43 हजार दोनशे रॉयल ब्लु माल्टच्या बॉटल आढळल्या. गोवा राज्य निर्मित आणि फक्त गोवा राज्यात विक्रीकरता हा गोवा बनावट मद्यसाठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. अटकेतील गामीत सिंगाभाई गुजरातचा तर मोहन खताथ हा राजस्थानमधील आहे. त्यामुळं या टोळीचा गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र असं कनेक्शन असल्याचा उत्पादन शुल्क विभागाला संशय आहे.


विशेष मोहिमेअंतर्गत यापूर्वी गुन्हे दाखल


पुण्यात अवैध दारु विक्री आणि अवैध दारु सेवन करणाऱ्या विरुद्ध विशेष मोहिम राबवली आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे 68 आणि 84 कलमानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध जिल्ह्यात 7 ते 9 जानेवारी दरम्यान विशेष मोहिम राबवली होती. एकूण 29 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती (state excise department) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाने दिली होती. त्यानंतरदेखील कारवाईचा तडाखा सुरुच आहे.अवैध दारु विक्री करणाऱ्या किंवा वाहतूक करण्याऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.  माहिती मिळताच पोलीस सापळा रचून अशा अवैध दारु विक्री करणाऱ्यांचा कट उधळून लावत आहेत. यापूर्वी 31 डिसेंबरला मोठी कारवाई केली होती. त्यावेळी पोलिसांनी तब्बल 1 कोटी 70 लाख रुपयाची विदेशी दारू जप्त केली होती. या प्रकरणी सात जणांना अटक केली होती.