पुणे : दारु पिताना हटकल्यामुळे चक्क पोलिसाचं अपहरण करुन त्याला मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. दारु पिणाऱ्या तिघा तरुणांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे बीट मार्शल सचिन तनपुरे यांचं अपहरण केलं. आरोपींनी तनपुरेंकडील वॉकी-टॉकी हिसकावून त्यांना मारहाणही केली.
हा प्रकार रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर घडला. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली तर अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला.
मुळशीतील नांदे गावामध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय जगन्नाथ दिनबंधू रॉय याला सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचे साथीदार सचिन बाळू रानवडे आणि मयुर अरुण मते हे पसार झाले आहेत.
सचिन तनपुरे आणि त्यांचे सहकारी रात्रीच्या वेळी सिंहगड रोड परिसरात गस्त घालत असताना त्यांना रस्त्यावर पाठीमागे नंबर प्लेट नसलेली एक ब्रिझा कार उभी असल्याचं दिसले. त्यामध्ये तीन जण दारु पित बसले होते. यावेळी मार्शल तनपुरे यांनी त्या गाडीत बसून अभिरुची चौकीला चलण्यास सांगितलं.
त्यानंतर गाडीतील तिघांनी गाडी पोलिस चौकीला न नेता तनपुरे यांना मारहाण करुन, जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडील मोबाईल आणि वॉकी-टॉकी बळजबरीने हिसकावून घेतला. त्यांचं अपहरण करुन मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरुन बावधनला पळवून नेलं आणि सोडून दिलं.
दारु पिताना हटकल्याने पुण्यात पोलिसाला अपहरण करुन मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2019 12:20 PM (IST)
सिंहगड रोड परिसरात गस्त घालत असताना बीट मार्शल सचिन तनपुरे यांना रस्त्यावर पाठीमागे नंबर प्लेट नसलेली एक ब्रिझा कार उभी असल्याचं दिसली. त्यामध्ये तीन जण दारु पित बसले होते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -