पुणे/नागपूर: पुण्यातील एल्गार परिषदे प्रकरणी, कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय आणि घरावर पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे.

पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव इथे हिंसाचार उफाळला होता. त्याच्या निषेधार्थ दलित संघटनांनी 3 जानेवारीला राज्यभरात बंद पुकारला होता.

या घटनेनंतर 7 जानेवारी 2018 रोजी कबीर कला मंचचे चार जण, तर रिपब्लिकन पँथरच्या चार जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर आता या प्रकरणात आज पहाटेपासून पुण्यातील कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तर मुंबईत रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर पुणे पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत.

कोणा-कोणाच्या घरी धाडी?

  • एल्गार परिषदे प्रकरणी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय आणि घरात झडतीसत्र

  • पुण्यात रमेश गायचोर, सागर गोरखेच्या वाकडमधील घरी पहाटेपासून छापा

  • नागपूरमध्ये अॅड सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी झडती सुरु

  • मुंबईत सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार यांच्या घरी झडतीसत्र


नागपुरात वकिलाच्या घरावर धाड

नक्षलवाद्यांच्या केसेस लढण्यासाठी प्रसिद्ध असलेले वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या नागपुरातील घरावर पोलिसांनी छापा टाकला. गेल्या तासाभरापासून त्यांच्या घराची पोलीस कसून तपासणी करतायत. गडलिंग गेल्या 20 वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या केसेस लढत आहेत. पुणे पोलिसांच्या टीमने ही धाड टाकल्याचं सांगितलं जातंय.

एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा

पुणे पोलिसांनी 9 जानेवारीला एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला होता.

कोरेगाव-भीमाच्या लढ्याला 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 31 डिंसेबर रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यावर एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमानंतर 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा जवळच्या सणसवाडी परिसरात हिंसाचार उफाळून आला होता. यात एका तरुणाचाही मृत्यू झाला होता. तर स्थानिकांचं मोठं नुकसान झालं होतं.

या हिंसाचाराप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पण या हिंसाचाराप्रकरणी आता एल्गार परिषदेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कबीर कला मंचचा समावेश करण्यात आला आहे. कबीर कला मंचाने एल्गार परिषदेत सादर केलेल्या गीतांतून लोकांना चेतवल्याचा गुन्हा पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल 

शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी 


संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाने इतिहासाची मोडतोड केली : भिडे गुरुजी


‘मला अडकवण्यासाठी कौरवनितीचा वापर’, भिडे गुरुजींची पहिली प्रतिक्रिया

देशाचे तुकडे होण्याआधी मी मरण पत्करेन : उदयनराजे

भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे

प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर भिडे गुरुजींचं स्पष्टीकरण


कोरेगाव-भीमामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाकडून शांततेचं आवाहन

कोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे : ग्रामस्थ

थर्टी फर्स्ट ते महाराष्ट्र बंद, पोलीस ऑन ड्युटी 72 तास

भिडे गुरुजींवरील गुन्हा मागे घ्या, सांगलीत समर्थनार्थ मोर्चा

दलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी : प्रकाश आंबेडकर

दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे : छत्रपती संभाजीराजे

सणसवाडी दगडफेकीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद

पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात

सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री