पुणे : तुम्ही जर शनिवारी (16 सप्टेंबर) आणि रविवारी (17 सप्टेंबर) पुण्याहून पंढरपूरकडे जाणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पुण्याहून जेजुरी - फलटण मार्गे जर तुम्ही पंढरपूरला जाणार असाल किंवा पंढरपूरहून पुण्याकडे येणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे पंढरपूर मार्गावरील जेजुरी- निरा दरम्यान थोपटेवाडी येथे असलेलं पुणे- मिरज रेल्वे मार्गावर वरचं 27 नंबरच गेट हे दोन दिवस बंद असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ही शनिवार आणि रविवार बंद असणार आहे.


ज्या लोकांना या मार्गावरून पंढरपूरला जायचे असेल किंवा पंढरपूरहुन आळंदीला यायचं असेल अशा लोकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असा आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी रेल्वे मार्गाच्या कामासाठी हे रेल्वे गेट बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.


तुम्ही जर पुण्याहून पंढरपूरला जाणार असाल तर पुणे- शिरवळ- लोणंद मार्गे तुम्ही पंढरपूरला जाऊ शकता. किंवा सोलापूर हायवे मार्गे तुम्ही पंढरपूरला जाऊ शकता. या पर्यायी मार्गाचा वापर पंढरपूरकडे जाणाऱ्या लोकांनी करावा अस आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.


रेल्वे प्रशासनाकडून  वाल्हे आणि नीरा ग्रामपंचायत कार्यालयाला यासंदर्भातील पत्र देण्यात आले आहे. परंतु ऐन गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई पुण्याहून गावी जाणाऱ्या प्रवाशांना या पालखी महामार्गावरील रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता जेजुरीतून मोरगाव आणि पुन्हा नीरा येथे येऊन प्रवाशांना पुढील प्रवास करावा लागणार आहे. 


नागरिकांकडून नाराजी


हा मार्ग बंद ठेवणार असल्याने नागरिकांना किंवा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यांनी फेरफटका मारत पुण्यात दाखल होता येणार आहे. त्यासाठी तब्बल 40 किलोमीटरचा वळसा सर्व प्रवाशांना पडणार आहे. येत्या काहीच दिवसांत गणेशोत्सव आहे. त्यासाठी तयारी सुरु झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी येणारे हे शेवटचे शनिवार-रविवार असणार आहे. त्यामुळे अनेक नागरिक खरेदीसाठी पुण्यात येत असतात. मात्र हे रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशांना काही प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर प्रवाशी वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Pune News : महाराष्ट्रातील 'या' गावात राजकीय नेत्यांना बंदी, नेमकं काय आहे कारण?