पुण्यात टिंबर मार्केटमध्ये भीषण आग, 40 घरं खाक, आग आटोक्यात
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2017 09:15 AM (IST)
पुणे : पुण्यात टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत 30 ते 40 घरं जळून खाक झाली आहेत. आज पहाटे पाचच्या सुमारास गोदामं आणि घरांना आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या आणि 4 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाल्या. तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सध्या इथे कूलिंग ऑपरेशन सुरु आहे. इथे सिलेंडरचे स्फोट झाल्याचीही माहिती आहे. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. तसंच जीवितहानी झाली नाही.