मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांच्या निकालात महाविकास आघाडीने सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे तर पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला आहे. नागपूर पदवीधर विधानपरीषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत.


काँग्रेसने भाजपचा गड ध्वस्त केला
काँग्रेस एकत्र आली आणि गटातटाचे राजकारण बाजूला ठेवले तर काय होऊ शकतं याचे उदाहरण म्हणजे नागपूर पदवीधर निवडणूक. नागपूर पदवीधर म्हणजे भाजपचा गड
वर्षानुवर्षे ही जागा भाजपचा पारंपारिक गड राहिला. नितीन गडकरी यांचा तो मतदारसंघ. त्यात यावेळी उमेदवारी मिळाली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू संदीप जोशी यांना.


शिक्षक, पदवीधरमध्ये भाजपला दणका, महाविकास आघाडीची सरशी, जाणून घ्या कुठं कोण जिंकलं, कोण आघाडीवर?


काँग्रेसने तरुण आणि गेली दीड वर्ष या मतदारसंघात यांनी मेहनत घेतली असे अॅड अभिजित वंजारी यांना संधी दिली. काँग्रेसममध्ये उमेदवारी देण्यावरून ही नाराजी नाट्य होतं पण तसं न होता अभिजित वंजारी यांना काँग्रेसने ताकद दिली. अभिजित वंजारी मेहनत करत होते पण विदर्भातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पण भूमिका बजावली.


पुणे पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय, विजयानंतर म्हणाले...


प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विदर्भातील सर्व काँग्रेस नेत्यांना एकत्र करून जबाबदारी दिली. ऊर्जामंत्री नितीन राऊत नागपूर शहर नागपूर ग्रामीण आणि वर्ध्याची जबाबदारी घेतली सुनील केदार यांनी. चंद्रपूर सांभाळलं विजय वडेट्टीवार यांनी. त्यांना साथ मिळाली राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख आणि प्रफुल पटेल, खासदार बाळू धानोरकर यांची. पुण्यासाठी देखील काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन इतिहास रचला. संपर्कमंत्री असलेल्या विश्वजित कदम यांच्यावर विशेष जबाबदारी होती.


उच्चशिक्षित 'अडाणी'? पदवीधरांच्या 'या' चुकांमुळं हजारो मतं ठरली अवैध


पुण्यात देखील बाळासाहेब थोरांताच्या नेतृत्वात संपर्कमंत्री असलेल्या विश्वजित कदम तसेच गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपली जबाबदारी पार पाडत विजय मिळवण्यात मोलाचा वाटा उचलला.


काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या जिल्ह्यात प्रचार आणि मतदानाची जबाबदारी बजावली आणि इतिहास घडला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर भाजपला पहिला तडाखा दिला तो नागपूर पदवीधरमध्ये. विदर्भात नेहमी भाजप विरुद्ध काँग्रेस लढाई होते. गेल्या काही वर्षात विदर्भात काँग्रेसचे नुकसान झाले. पण नागपूर पदवीधर निवडणुकीने किमान काँग्रेसला संजीवनी मिळाली..पक्ष एकत्र येऊन काम केलं तर काय करू शकतो हेच यातून दिसलं.


नागपूर जिल्हापरिषद आणि पाठोपाठ पदवीधर निवडणुकीत भाजपला धूळ चारत काँग्रेसने दाखवली एकीची ताकद दाखवली. राज्यात काँग्रेस आज चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे..पुणे शिक्षक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि नागपूर म्हणजे विदर्भात विधान परिषदेत काँग्रेसला यश मिळाल्याने संघटनेला नक्कीच इथे बळ मिळेल. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता काँग्रेसचा कस लागणार आहे.


पुणे पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय, विजयानंतर म्हणाले...