मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. पाचपैकी दोन जागांवर विजय तर दोन जागांवर आघाडी घेत महाविकास आघाडीनं भाजपला मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत एक विशेष मुद्दा समोर येत आहे तो म्हणजे अवैध ठरलेल्या मतांचा. उच्चशिक्षित मतदार असलेल्या पदवीधरांच्या या निवडणुकीत अवैध अर्थात बाद झालेल्या मतांचा आकडा मोठा आहे. त्यामुळं उच्चशिक्षित मतदारांकडून झालेल्या चुकांची चर्चा होत आहे.


मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत एकूण मतदान 2 लाख 41 हजार 908 इतके झाले. त्यापैकी तब्बल 23 हजार 92 इतकी मते अवैध ठरली. ही मतं विजयी उमेदवार सतीश चव्हाण आणि प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची मतं ठरली आहेत.


काय आहेत मतं अवैध ठरण्याची कारणं
पदवीधर निवडणुकीत मतदान करताना मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभ‌ळ्या शाईच्या स्केच पेननेच मत नोंदवावे लागते. इतर कोणत्याही पेनचा वापर करता येत नाही. तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंती क्रमांक नोंदवावा, रकान्यात 1 हा अंक लिहून मत नोंदवावे, असा नियम आहे.


शिक्षक, पदवीधरमध्ये भाजपला दणका, महाविकास आघाडीची सरशी, जाणून घ्या कुठं कोण जिंकलं, कोण आघाडीवर?


उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत. तितके पसंती क्रमांक नोंदवू शकतात. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकच पसंती क्रमांकाचा अंक नोंदवावा लागतो. तो पसंती क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये असा नियम आहे. पसंती क्रमांक हे केवळ 1, 2, 3, अशा अंकामध्ये नोंदवावा. एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांत नोंदवू नये असा नियम आहे. तरीदेखील उच्चशिक्षित 23 हजार पदवीधर उमेदवारांना मतदान करताना या चुका केल्यात हे विशेष.


पुणे पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय, विजयानंतर म्हणाले...


पदवीधरांनी पसंती क्रमांकाच्या ऐवजी राईट असं चिन्ह केलं. काहींनी रोमन अंकात पसंती क्रमांक दिला. तर काहींना एक क्रमांकही व्यवस्थित काढता आला नाही. काहींनी रकान्याच्या बाहेर क्रमांक टाकला. तर काहींनी अन्य चुका केल्या. त्यामुळे त्यांचं मतदान बाद ठरवण्यात आलं. यातील आणखी एक विशेष बाब म्हणजे टपाली मतदानामध्ये देखील मतबाद होण्याचे प्रमाण अधिक होतं. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघांमध्ये 1248 मतदान टपाली झालं होतं. हे मतदान कर्मचाऱ्यांचं होतं यातही 175 मत वेगवेगळ्या कारणानं बात झाली.


व्यवस्थेच्या विरोधात संताप...


पदवीधरमधील मतदान बाद होण्याच्या काही वेगळ्या शक्यताही वर्तवल्या जात आहेत. काही मतदारांनी त्यांच्या मागण्या, घोषणा वगैरे लिहून ठेवल्या आहेत. काहींनी जाणीवपूर्वक या व्यवस्थेच्या विरोधात संताप, निदर्शने व्यक्त करण्यासाठी या हा अवैध मार्ग निवडला असल्याचं बोललं जात आहे. तर काहींनी जागरुकता कमी पडली आणि यातील बहुतांश मतदार हे नवखे होते. राजकीय पक्ष, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने योग्य मार्गदर्शन केले नसल्याचे म्हटले आहे.


मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी