पुणे : आतापर्यंत आपण नवरा-बायकोचे अनेक वाद पाहिले असतील. मात्र मोबाईल फोनवर 'पाकिस्तानी ड्रामा' पाहत असल्याने पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेत पत्नीच्या उजव्या हाताचा अंगठा तुटला आहे. पुण्यातील सॅलीस्बरी पार्क परिसरात सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी पतीला अटक केली असून जखमी पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आसिफ सत्तार नायब असं 40 वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. आसिफ नायबचा होर्डिंग लावण्याचा व्यवसाय आहे. तर पत्नी नर्गिस गृहिणी आहे. त्यांना दोन अपत्य आहेत. नर्गिस आणि आसिफचं सोमवारी सकाळी भांडण झालं होतं आणि ते एकमेकांशी बोलत नव्हते. यानंतर संध्याकाळी आसिफ घरी येताच नर्गिस बेडरुममध्ये निघून गेली. यानंतर आसिफही बेडरुममध्ये गेला आणि तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करु लागला. परंतु नर्गिस मोबाईलवर 'पाकिस्तानी ड्रामा' पाहत होती.
पत्नी आपल्याकडे दुर्लक्ष करुन मोबाईलवर 'पाकिस्तानी ड्रामा' पाहण्यास जास्त महत्त्व देत असल्याची भावना आसिफच्या मनात निर्माण झाली. यामुळे संतापलेल्या आसिफने नर्गिसवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. वार अडवण्यासाठी उजवा हात पुढे केल्याने तिचा अंगठा तुटला. यानंतर नर्गिस यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी घरी आले आणि त्यांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मग पोलिसांनी आसिफला अटक केली.
मोबाईलवर 'पाकिस्तानी ड्रामा' पाहत असल्याने संताप, पुण्यात पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Mar 2019 08:10 AM (IST)
आसिफ सत्तार नायब असं 40 वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. आसिफ नायबचा होर्डिंग लावण्याचा व्यवसाय आहे. तर पत्नी नर्गिस गृहिणी आहे. त्यांना दोन अपत्य आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -