मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Group ) यांच्या गटाकडून युवासेनेची (Maharashtra Yuva Sena) कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.  शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या कार्यकारिणीत शिंदे गटातील नेत्यांच्या मुलांना संधी देण्यात आल्याचे कार्यकारिणीतील नावांवरून दिसून येत आहे. मंत्री दादा भुसे, अर्जुन खोतकर, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलांना या कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.  याबरोबरच  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करणाऱ्या चेहऱ्यांना शिंदेंच्या युवासेनेच्या कार्यकारिणीमध्ये जबाबदारी देण्यात आली आहे.  


एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. परंतु, ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर बंडखोरी केल्यापासून एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेला वेगवेगळ्या पद्धतीने सतत आव्हान देण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी आपलीच शिवसेना खरी असल्याचे सांगत बंडखोरीनंतर त्यांच्या गटाची नवी कार्यकारिणी जाहीर केली होती. त्यानंतर आता शिंदे गटाकडून युवासेनेची देखील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा धक्का असल्याचे बोलले जात आहे.   


शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदार आणि 18 खासदारांपैकी 12 खासदार शिंदे गटाकडे आले आहेत. त्यामुळे खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. निवडणूक आयोग खरी शिवसेना कोणाची हे ठरवणार आहे. परंतु, त्याआधीच शिंदे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्यामुळे याचा देखील या निकालावर परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. 


युवा सेना कार्यकारणी सदस्य 


उत्तर महाराष्ट्र :
अविष्कार भुसे 


मराठवाडा :
अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील 


कोकण : 
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 
विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे 


पश्चिम महाराष्ट्र :
किरण साली, सचिन बांगर 


कल्याण भिवंडी :
दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक 


ठाणे, नवी मुंबई व पालघर :
नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे 


मुंबई :
समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे 


विदर्भ :
ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील


महत्वाच्या बातम्या


Maharashtra Politics Shivsena: बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांच्या हाती शिवबंधन, मंत्री संजय राठोड यांना धक्का 


Dasara Melava: दसरा मेळाव्याआधी वातावरण तापलं; शिवसेना आणि शिंदे गटाकडून मेळाव्याचे टीझर लाँच