पुणे : यंदा गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोने खरेदीचा संकल्प केला असेल तर सराफांच्या मनमानीमुळे तो बारगळणार आहे. कारण गुढीपाडव्यालाही संप कायम ठेवून ग्राहकांची कोंडी करण्याचा सराफांनी चंग बांधलेला दिसत आहे.

 

केंद्र सरकारने एक टक्का अबकारी कर मागे घ्यावा, या मागणीसाठी महिनाभरापासून सरफांचा संप सुरु आहे. महाराष्ट्र सराफ असोसिएशनने संप मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर सोनेखरेदी करणं अशक्य होणार आहे.

 

मात्र लग्नसराई आणि गुढीपाडव्यालाही सराफांनी अडवणूक केल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.

 

पाहा व्हिडीओ