पुणे: कार रिव्हर्स घेताना मागील चाकाखाली दीड वर्षाची चिमुकली आल्याने, तिचा दुर्दैवी अंत झाला. पुण्यातील नारायण पेठेत ही धक्कादायक घटना घडली.
सुप्रिया वेंकट वालिका असं या चिमुरडीचं नाव आहे. सुप्रिया ही सीताराम अपार्टमेंट या इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळत होती. त्यावेळी त्याच इमारतीत राहणारा एक व्यक्ती आपली कार पार्किंगमधून काढत होता. त्यावेळी चिमुकली सुप्रिया कारच्या मागील चाकाखाली आली आणि तिचा दुर्दैवी अंत झाला.
याप्रकरणी नारायण पेठ पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.