पुण्याच्या बिबवेवाडीतील गोदामाला भीषण आग
एबीपी माझा वेब टीम | 30 Dec 2016 12:05 PM (IST)
पुणे : पुण्यात बिबवेवाडी परिसरात कारपेट गोडाऊनला भीषण आग लागली आहे. बिबवेवाडीतील आई माता मंदिराशेजारी असलेल्या गोडाऊनला ही भीषण आग लागली आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि 2 पाण्याचे टँकर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत. दरम्यान ज्या ठिकाणी हे गोदाम आहे, त्याच्या आजूबाजूला रहिवासी वस्ती आहे. आगीचे लोट एवढे भीषण आहेत की परिसरात सगळीकडे धूरच धूर झाला आहे.