पुणे: पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाघोलीत घडली.  अभयसिंह मचे असं आत्महत्या केलेल्या 34 वर्षाच्या डॉक्टरचं नाव  आहे. ते डेंटिस्ट होते.

धक्कादायक म्हणजे चैनीच्या वस्तू देत नसल्याने पत्नीकडून सतत छळ होत असल्याचं कारण अभयसिंह सुसाईड नोटमध्ये दिलं आहे.

5 तारखेला ही घटना घडली. मात्र मचे कुटुंबीय गावाहून आल्यानंतर काल याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

अभयसिंह यांनी सुसाईड नोटमध्ये पत्नी चैनीच्या वस्तू मागायची असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर पत्नी स्वत:च्या मुलीच्या जवळ जाऊ देत नव्हती, तसंच मुलीलाही आपल्याकडे येऊ देत नाही, असाही उल्लेख सुसाईडनोटमध्ये आहे.

लोणीकंद पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.