Pune Crime : पूर्ववैमनस्यातून हत्याराने वार करुन (Pune) दोघांची निर्घृण हत्या (murder) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शंकर चव्हाण (Shankar Chavan) यांच्यावर केलेल्या गोळीबाराचा (pune crime) बदला घेण्यासाठी धारधार शस्त्राने सपासप वार वरुन दोघांची हत्या केली. पुण्यातील येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील पांडु लमाण वस्तीत हा प्रकार घडला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष ऊर्फ किसन राठोड आणि अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. ही घटना रात्री 3 वाजता घडली. सुभाष राठोड याने 2008-09 मध्ये शंकर चव्हाण यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी राठोडला शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून आल्यानंतर राठोड बाहेर आला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घडलेल्या प्रकरणी राठोड यांचा भाऊ लक्ष्मण राठोड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 


रस्त्यावर अडवून टोळीकडून दोघांवर सपासप वार
तिघे पहाटेच्या वेळी गाडीवरुन जात होते. त्यावेळी 8 ते 10 जणांच्या टोळीने त्यांचा रस्ता अडवला. त्यावेळी दोन्ही गटात चकमक झाली. टोळीने त्यांच्यावर सपासप वार करुन दोघांची हत्या केली. यावेळी दोघं टोळक्याच्या हाती सापडले आणि तिसऱ्याला पळून जाण्यात यश आलं. यानंतर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात असलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 


पुण्यात हत्येचं सत्र संपेनाच...
दोन दिवसांपूर्वी पुण्यातील औंध भागातील 22 वर्षीय तरुणीचा खून करणाऱ्या प्रतिक ढमाले या युवकाने स्वतः देखील आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. पुण्यातील (Pune) बावधन भागात त्याचा मृतदेह आढळून आला होता. 9 नोव्हेंबरला प्रतिक ढमालेने 22 वर्षीय श्वेता रानवडेचा राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमधे धारदार शस्त्राने खून केला होता. प्रतिक आणि संबंधित तरुणी मागील पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि दोघांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या लग्नाची बोलणीही सुरु होती. मात्र मुलीकडच्या नातेवाईकांनी लग्नास नकार दिल्याने प्रतिक अस्वस्थ झाला होता. त्यातूनच त्याने या मुलीला सोसायटीच्या पार्किंगमध्ये भेटण्याचे कारण देऊन बोलावले आणि धारदार शस्त्रांच्या सहाय्याने तिचा खून केला. हत्येनंतर प्रतिक ढमाले फरार झाला होता. मात्र त्यानेही आत्महत्या केल्याचं उघड झालं होतं. पुण्यात क्षुल्लक कारणावरुन हत्येच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.