मुंबई उच्च न्यायालयानं शहरी नक्षलवाद प्रकरणी नवलखा यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यास नकार दिल्याच्या निर्णयाला नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मात्र तिथंही अटकपूर्व जामीनासाठी त्यांना हायकोर्टातच जाण्याचे निर्देश देण्यात आलेत. यासाठी दिलेली चार आठवड्यांची मुदत 12 नोव्हेंबरला संपत असल्यानं नवलखा यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टानं यावर सुनावणीस नकार देत नवलखांना पुन्हा खटला सुरू असलेल्या पुणे सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते.
गौतम नवलखा यांनी काश्मिरमध्ये जाऊन फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याचे पुरावेही कोर्टात सादर करण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांशी चर्चेत वेळोवेळी सरकराची मदत केल्याचा दावा करणाऱ्या गौतम नवलखा यांनी नेहमीच नक्षलवाद्यांची बाजू घेतली आहे, असा आरोप राज्य सरकारनं केला आहे. छत्तीसगडमधील बस्तरमध्ये साल 2017 मध्ये झालेल्या नक्षलवादी हल्याच्या कटातही नवलखांचा सहभाग होता पुराव्यांवर दिसत आहे. नक्षलवादी विचारांच्या समूहाचे नवलखा सदस्यही होते त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.