मुंबई: पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं यंदाचा टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आणि काँग्रेसमध्ये त्यावरुन दोन गट पडले. काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी यावरुन मोदींची पाठराखण केली आहे तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. लोकशाहीविरोधी मोदींना हा पुरस्कार देणे हे लोकमान्य टिळकांनाही आवडलं नसतं असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं. 


यंदाचा लोकमान्य टिकळ राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधानांना जाहीर झाला असून 1 ऑगस्ट रोजी त्याचं वितरण होणार आहे. या पुरस्काराची घोषणा रोहित टिळक यांनी केली. रोहित टिळक हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून काम केलंय. तसेच कसबा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर दोनदा विधानसभा लढवली होती. 


मात्र त्यावरुन आता काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं दिसतंय. आधी पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्षांनी त्याला विरोध करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्याकडे तक्रार केली. त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, लोकमान्य टिळक हे जर आज जिवंत असते तर त्यांनाही मोदींना दिलेला पुरस्कार आवडला नसता. मोदींनी लोकशाहीविरोधात काम केलंय आणि त्यांना टिळक पुरस्कार दिला जातोय. 


Vishwajeet Kadam On Narendra Modi : विश्वजीत कदमांची वेगळी भूमिका 


एकीकडे काँग्रेसमधून  मोदींनी देण्यात येणाऱ्या या पुरस्काराला विरोध होत असताना काँग्रेसचे नेते विश्वजीत कदमांनी मात्र यावर वेगळी भूमिका घेतली आहे. हा पुरस्कार एका खासगी ट्रस्टकडून देण्यात येतोय. देणाऱ्याने तो पुरस्कार दिला आणि घेणाऱ्याने तो घेतला असं म्हणत विश्वजीत कदमांनी या पुरस्काराचे अप्रत्यक्षपणे समर्थन केल्याचं दिसतंय. 


दरवर्षी देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान 1 ऑगस्ट रोजी पुण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. 


लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला 1 ऑगस्ट 1983 पासून करण्यात आली. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. 1983 पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी एस.एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन.आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. कैलासावडिवू सिवन, बाबा कल्याणी, सोनम वांगचुक, डॉ. सायरस पूनावाला यांच्यासह बाकी दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.


ही बातमी वाचा: