पुणे : पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयाचे रुपांतर आता विद्यापीठामध्ये झाले आहे. या महाविद्यालयाला राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियांनातंर्गत तब्बल 55 कोटींचा निधी लवकरच मिळणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय शिक्षण विभागाकडून  देण्यात आली.


मुंबईतील सेंट झेव्हिअर्स आणि मिठीबाई या महाविद्यालयांनी देखील विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी अर्ज केला होता. परंतु सध्या तरी या महाविद्यालयांचे अर्ज प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, बंगळुरुतील गव्हर्मेंट सायन्स कॉलेज आणि सेंट जोसेफ कॉलेजला देखील विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.

शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालय असून, या महाविद्यालयातून अनेक नामवंत व्यक्तींनी आतापर्यंत शिक्षण घेतले आहे.