पिंपरी चिंचवड : पुणे शहरातील (Pune City Unlock) सर्व दुकानं सायंकाळी सात पर्यंत खुली राहणार आहेत. पण अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad City Unlock) शहरात मात्र वेगळी नियमावली आहे. इथं सायंकाळी चार पर्यंतचीच मुभा देण्यात आली आहे. पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवडमध्ये एक हजार अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे. पण तरी ही पिंपरी चिंचवड शहरात आणि पुण्यात वेगवेगळी नियमावली का? असा प्रश्न पिंपरी चिंचवडकरांना पडलाय. तर यामागे पॉझिटिव्ह रेटचा निकष लावण्यात आलाय. पिंपरी चिंचवड शहराला या निकषात बसण्यासाठी अवघ्या 0.31 टक्के इतका पॉझिटिव्ह रेट कमी करावा लागणार आहे.


पुणे महानगरपालिका हद्दीतील आजचा कोरोना पॉझिटिव्ह रेट हा पाच टक्क्यांच्या खाली आलाय. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पॉझिटिव्ह रेट पाच टक्क्यांखाली आल्यानंतर अनलॉकचा पुढचा टप्पा जाहीर केला होता. त्यानुसार पुण्यात आजपासून सर्व दुकानं खुली ठेवण्याला सकाळी सात ते सायंकाळी सात अशी मुभा देण्यात आली आहे. हॉटेल रात्री दहा पर्यंत खुली ठेवण्याची तर रात्री अकरा पर्यंत पार्सल सेवेची ही परवानगी देण्यात आली आहे.


अॅक्टिव्ह रुग्ण तीन हाराजांच्या घरात असणाऱ्या पुणे शहरात आजपासून अनलॉकची ही नवी नियमावली लागू करण्य. पण याच पुण्यापासून अवघ्या काही मीटर अंतरावरील पिंपरी चिंचवडमध्ये अवघे एकविशे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. मात्र तरी देखील ही इथं पुण्याची नियमावली लागू होत नाही. म्हणूनच पुण्यातील खडकीत आजपासून सायंकाळी सात पर्यंत दुकानं खुली असतील. पण या दोन्ही शहरांना दुभागणारा हॅरीस पूल ओलांडला की मात्र वेगळं चित्र पहायला मिळतं. हा पूल ओलांडताच दापोडी लागते आणि इथली दुकानं मात्र सायंकाळी चार वाजताच बंद झालीत. तर हॉटेल चालकांना रात्री 10 पर्यंत पार्सल सेवेची मुभा आहे. 


पुण्याच्या तुलनेत पिंपरी चिंचवडमधील अॅक्टिव्ह रुग्ण एक हजारांपेक्षा कमी आहेत. मग इथं पालकमंत्री अजित पवारांनी अनलॉकची नवी नियमावली का लागू केली नाही? असा प्रश्न पिंपरी चिंचवडकरांना पडलाय. ही नियमावली लागू करताना पॉझिटिव्ह रेट पाच टक्केपेक्षा कमी असायला हवा, असा निकष लावण्यात आलाय. या निकषात पिंपरी चिंचवड अद्याप मोडत नाही. कारण पिंपरी चिंचवडचा पॉझिटिव्ह रेट हा 5.31 टक्के इतका आहे. म्हणूनच पिंपरी चिंचवडकरांना अनलॉकची आजपासूनची शिथिलता मिळालेली नाही. अजित पवारांच्या उपस्थित होणाऱ्या पुढच्या बैठकीपर्यंत 0.31 टक्के पॉझिटिव्ह रेट कमी करण्याचं आव्हान आहे. पिंपरी चिंचवडला प्रशासनाला हे आव्हान पूर्ण करायचं असेल तर शहरवासीयांचा हातभार गरजेचा आहे. तरच अनलॉकची नवी नियमावली इथं लागू होऊ शकतो.