Anjali Damania on Dhananjay Munde: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचा धडाका लावला आहे. एका प्रचार सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी परळीतील लोकांना अडचणीत असताना देवाच्या आधी धनंजय मुंडे आठवतात, असे वक्तव्य केले. तर दुसऱ्या प्रचार सभेत माझं राजकारणच नाही तर मलाच संपवायच्या मागे लागले आहेत, असा खळबळजनक दावा धनंजय मुंडे यांनी केला. आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

Continues below advertisement

Anjali Damania on Dhananjay Munde: मग तुम्हाला कोण संपवणार?

अंजली दमानिया म्हणाल्या की, कोण म्हणतं आयुष्यातून संपवणार? त्यांची कृतीच त्यांना संपवणार आहे. कराडसारख्या गुंडांना त्यांनी जी साथ दिली, त्यामुळे आज त्यांच्याविरुद्ध लढावे लागले. तो लढा एका व्यक्तीविरुद्ध नव्हता तर त्यांच्या प्रवृत्ती विरुद्ध होता. त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. यामध्ये भावनिक साद घालण्याची वेळ का आली? जो व्यक्ती एवढ्या वाईट पद्धतीने बीडच्या जनतेशी वागला, त्रास दिला, अशा व्यक्तीला राजकारणातून बाजूला ठेवण्याची गरज आहे. धनंजय मुंडे म्हणत होते लोक देवाकडे जात नव्हते, माझ्याकडे येतात. मग आज अचानक कसं काय त्यांना वाटलं? तुम्ही देवा पेक्षा मोठे आहात मग तुम्हाला कोण संपवणार? असा सवाल उपस्थित करत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. 

Anjali Damania on Eknath Shinde Ajit Pawar: अंजली दमानियांचा एकनाथ शिंदे, अजित पवारांना टोला 

पुण्यातील पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहाराचं प्रकरण अंजली दमानिया यांनी लावून धरले आहे. यासाठी त्या दिल्लीत गेल्या आहेत. अंजली दमानिया यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र, अमित शाह यांची भेट होऊ शकली नाही. याबाबत विचारले असता अंजली दमानिया म्हणाल्या की, पुणे मुंडवा जमीन प्रकरण हा खूप गंभीर विषय आहे. खोटे डॉक्युमेंट बनून फ्रॉडने ताबा घेण्याच्या प्रयत्न होता. एवढे पुरावा सादर करून सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर त्यांच्या राजीनामा घेत नसतील तर माझ्याकडे जास्त काही चॉईस नव्हता. मी ज्यावेळी दिल्लीला गेले त्याच संध्याकाळी अमित शाह हे दिल्लीवरून छत्तीसगडला गेले. आज संध्याकाळी ते परत दिल्लीला येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून दिली आहे. रात्री त्यांच्या कार्यालयातून मला कळवले जाणार आहे. त्यांच्याकडून उद्या किंवा परवाची वेळ मिळणार आहे. जशी वेळ भेटेल तसं मला दिल्लीला जावं लागणार आहे. कारण माझ्याकडे एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासारखे चार्टर्ड प्लेन नाही. त्यामुळे मला तिकीट बुक करून जावं लागणार आहे. ते जे वेळ देतील त्याप्रमाणे तिकीट बुक करून मी जाणार आहे, असे त्यांनी म्हटले. 

Continues below advertisement

आणखी वाचा 

Dhananjay Munde Parli Election: "नगरपरिषद निवडणूक माझ्यासाठी महत्त्वाची, गडबड करु नका"; काहीजण मला संपवायच्या मागे लागलेत, धनंजय मुंडेंची परळीकरांना आर्त साद