Pune Accident : पुण्यात (Pune) रस्त्यांच्या खड्ड्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. पुण्यातील औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोर ही घटना घडली आहे. रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यामुळं या ज्येष्ठ नागरिकाची गाडी घसरली अशातच मागून आलेल्या कारने त्यांना चिरडले. जगन्नाथ काशिनाथ काळे (वय 61) असं त्यांचं नाव होते. या संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
काल दुपारी पुण्यातील औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोर धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव घेतला आहे. औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोरुन गाडी चालवत असताना रस्ता आणि पेविंग ब्लॉकच्या मध्ये खड्डा निर्माण झाल्यामुळे या खड्ड्यातून गाडी घसरली. यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा तोल गेला. मात्र तेवढ्यात मागून आलेल्या कारच्या खाली ते चिरडले गेले.
दोनच दिवसापूर्वी संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर झाला होता भीषण अपघात
नागपुरात एका इमारतीतून काही दगड खाली पडल्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान
नागपुरातील सिविल लाईन्स परिसरात नागपूर प्रेस क्लब जवळ एका निर्माणाधीन इमारतीतून काही दगड खाली पडल्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. प्रेस क्लब जवळ एका उंच इमारतीचे बांधकाम सुरू असून निर्माणाधीन इमारती लगतच्या रस्त्यावर काही चारचाकी वाहन आणि दुचाकी पार्क केलेल्या होत्या. मात्र उंचावरुन दगड खाली पडल्यामुळे त्याचे काही तुकडे कार आणि दुचाकी वर पडले. त्यामुळं काही कारचे काच व सनरुफ तुटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
जळगावात भीषण अपघात! भरधाव दुचाकी अन् पिकअपची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू, चालक फरार