Pune accident : पुण्यातील हडपसर परिसरात मोठा अपघात झाला आहे. एका कॉन्क्रिट मिक्सर ट्रकनं एकाच वेळी चार रिक्षांना धडक दिली आहे. या भीषण अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. रिक्षात अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कॉन्क्रिट मिक्सर ट्रक खाली अडकलेल्या रिक्षा क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आल्या आहेत.
अपघात स्थळी पोलीस आणि अग्निशामक दल दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरु आहे. माहितीनुसार हा अपघात सकाळी सहाच्या सुमारास घडला. सोलापूरवरून भरधाव वेगाने हा कॉन्क्रिट मिक्सर ट्रक येत होता. आडवी आलेल्या दुचाकीला वाचवण्यासाठी मिक्सर ट्रकने वळण घेतलं. त्यानंतर ट्रक चालकाचा ताबा सुटला. ट्रकने या परिसरातील मोठ्या झाडांना धडक दिली आणि हडपसरच्या गाडीतळ परिसरातील उभ्या असलेल्या रिक्षांना कॉन्क्रिट मिक्सर ट्रक धडकला. या धडकेत रिक्षांचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर कॉन्क्रिट मिक्सर ट्रकचा चालक फरार झाला आहे.
अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंभीर जखमींवर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्कूटीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात सिमेंट मिक्सर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि हे वाहन रिक्षावर उलटलं. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या तत्परतेने अन्य जीव वाचवण्यात यश आलं. तीन क्रेनच्या सहाय्याने चिरडलेल्या रिक्षांना बाहेर काढण्यात आलं.
हडपसरमध्ये अपघाताचं सत्र सुरुच
हडपसरमध्ये अपघाताचं सत्र सुरुच आहे. एक महिन्यापूर्वी याच परिसरात चिमुकलीला कंटेनरने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली होती. वडिलांसोबत शाळेत जात असताना हा अपघात घडला होता. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकारणावाबत नोंद करण्यात आली होती. यात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला होता. नीलेश साळुंखे आणि मीनाक्षी साळुंखे अशी मृतांची नावे होती. वडील रोजप्रमाणे शाळेत सोडायला निघाले होते. त्यावेळी अचानक एका कंटेनरने मागून सात वर्षीय मुलीला धडक देत चिरडलं होतं. मीनाक्षी साधना विद्यालयात पाचवीत शिकत होती. नीलेश हे फुरसुंगीहून हडपसरकडे आपल्या मुलीच्या शाळेच्या दिशेने जात होते. सातववाडी येथे मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये नीलेश हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या