Pune Accident : पुणे शहरात सिंहगड रस्त्यावर (Pune Accident News) एक अपघात घडला. या अपघाताचे सीसीटीव्ही समोर आला असून हा अपघात थरारक होता. सिंहगड रोडवर असणाऱ्या रोहन कृतिका सोसायटीच्या समोर एक सिग्नल आहे. हे सिग्नल ओलांडताना डंपरने एका महिलेला धडक दिली. सिग्नल सुटण्याच्या वेळेस महिला झेब्रा क्रॉसिंगवरून जात होती. यावेळी महिला थेट डंपर खाली आली. तरीही डंपर चालकाला महिला दिसली नाही. डंपर पुढे गेल्यानंतर ही महिला जागेवर उठून बसली आणि जाणाऱ्या लोकांनी महिलेला रस्त्याच्या बाजूला आणलं.
ठोंबरे असे या महिलेचा आडनाव असून तिच्या पायाला दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर बाजूच्या लोकांनी महिलेला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केला आहे. ठोंबरे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या संदर्भात दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
तेव्हा डंपरनच जीव घेतला होता...
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी फाट्याजवळ अपघात झाला होता. भरधाव डंपरने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिली होती. त्यानंतर दुचाकीवरील नवविवाहित तरुणीचा समोरुन येणाऱ्या टँकरखाली पडून जागीच मृत्यू झाला होता. अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली गेली. शिवानी शैलेश पाटील असे या अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव होतं. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले होतं. शिवानी हिचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. ती आपल्या पतीसोबत गाडीवरुन कामाला जात होती. किरकटवाडी फाट्याजवळील रामेश्वर पतसंस्थेच्या समोर वाहनांची वर्दळ असताना मागून भरधाव वेगात आलेल्या अवजड डंपरने दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत शिवानी आणि तिचा पती दोघेही रस्त्यावर पडले होते.
भरधाव डंपर घेतायेत अनेकांचे जीव
पुणे आणि पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अपघाताच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचं बघायला मिळालं आहे. त्यात डंपरची धडक लागून झालेल्या अपघातांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा डंपरचा वेग अनेकांच्या मृत्यूचं कारण बनत आहे. कालच भरधाव डंपरच्या धडकेत एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पुण्यातील वाघोली परिसरात हा अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुपारी एक वाजता केसनंद फाट्याजवळ डंपरने धडक दिली. यात दोघांचाीही मृत्यू झाला. यानंतर डंपर चालकाने पळ काढला. त्यानंतर आता पोलीस या डंपर चालकाचा शोध घेत आहेत.
हेही वाचा-