पुणे: इंजिनिअरिंगच्या तरुणीवर कॉलेज मित्रांचा बलात्कार, पाच आरोपी अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 21 Oct 2016 08:07 PM (IST)
पुणे: पुण्यातील वाघोली परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार झाला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तरुणीच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन मित्रांनी हा बलात्कार केला. याप्रकरणी तिन्ही आरोपींना काल अटक करण्यात आली होती, तर रात्री उशिरा दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाघोली परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात पीडित तरुणी आणि आरोपी विद्यार्थी शिक्षण घेतात. कॉलेज जवळच्या परिसरात असलेल्या आरोपीच्या रुमवर हा प्रकार घडला. या प्रकरणी करण घुगे आणि महेश कोरडे या आरोपींविरोधात बलात्काराचा, तर अविनाश शेळकेविरोधात मोबाईलद्वारे मेसेज करून त्रास दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी करण घुगे पीडित तरुणीला सबमिशनला मदत करण्याची विनंती करत रुमवर घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. भीतीपोटी हा प्रकार मुलीनं सांगितला नाही. त्याचा गैरफायदा घेत महेश कोरडेनं दुसऱ्यादिवशी पीडीत मुलीवर बलात्कार केला. करण हा तिसऱ्या वर्षात शिकतो, तर पीडित मुलगी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचं शिक्षण घेत आहे. तर महेश कोरडे हा सुद्धा पहिल्याच वर्षाचा विद्यार्थी आहे. या प्रकरणी करण घुगे आणि महेश कोरडे या दोघांविरोधात बलात्काराचा तर अविनाश शेळके विरोधात मोबाईलद्वारे मेसेज करून त्रास दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.