औरंगाबाद : कोरोनामुळे लॉकडाऊन लागला, त्यामुळे हाताला कामही नाही. त्यात वेगाने वाढणारी महागाई यामुळे सामान्य लोक  दुहेरी संकटात सापडलेआहे. खाद्य तेल, चहा पावडर, शेंगदाण्यासह इतर जीवनावश्यक  वस्तूंची भाववाढ  झाली आहे. कोरोनाच्या संकटात वाढती महागाई म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. गतवर्षीपासून देशभर कोरोना नावाचा संकट सामान्य लोकांच्या जीवनामध्ये अस्थिरता निर्माण करून गेलाय. त्यातच वाढती महागाई जगायचं कसं हा प्रश्नही निर्माण झाला आहे.


कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या, शहराच्या शहर लॉकडाऊनमुळे ठप्प झाली आहेत. त्यामुळे हाताला काम मिळणे मुश्किल झाले आहे. हातात पैसा नाही, तर आहे त्या पैशात जीवनावश्यक वस्तू कशा खरेदी करायची हा प्रश्न आहे. कारण गेल्या काही दिवसात तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. चहा पावडर आणि महाग झाला आहे. शेंगादाणे डाळीची वाढ झाली आहे.


जानेवारी महिन्यापर्यंत 90 रुपयात एक लिटर गोडतेल मिळायचं. आज त्याला 160 रुपये मोजावे लागतात. शेंगदाणेही किलोमागे 20 रुपयांनी महागलेत. चहाही महागला आहे. डाळींच्या किमतीतही वाढ झाली आहे. मार्च महिन्यात देशातील किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकात 7.39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च महिन्यातील महागाई ही गेल्या 8 वर्षांतील सर्वाधिक महागाई असल्याचे सांगण्यात आले आहे.


अंडी, मांस, माशांची वाढ फेब्रुवारीमध्ये -0.78 टक्क्यांवरून वाढून 5.38 टक्क्यांवर गेली आहे. खाद्यतेल,  देशभरात आलेली कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांचे रोजगार बंद झाले आहेत. यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नाही, पोटाला भाकर नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भविष्यातील भयानक स्थितीने सर्वसामान्य माणूस पुरता खचला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या