सांगली: आमदारांच्या पगारवाढीच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सुरात सूर मिसळला आहे.

 

''देशातील सर्वोच्च पदावरील अधिकाऱ्यांपेक्षा एक रुपया जास्त पगार आमदारांना मिळायलाच हवा.'' अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाणांनी आज घेतली.

 

पगारवाढीच्या मुद्द्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, ''आमदारांच्या मागील व्याप पाहता त्यांना वेतन वाढ आवश्यक आहे. याचा काही लोक गैरफायदा घेता आहेत हे खरं आहे. त्यामुळे यावर चर्चा होते हे साहजिक आहे.''

 

या पूर्वी आमदारांच्या पगारवाढीचं शरद पवारांनी उस्मानाबादमध्ये समर्थन केलं होतं. ''जो खर्च आमदारांना करावा लागतो, त्याच्या तुलनेत मिळणारा पैसा पुरेसा नाही.'' असं मत पवारांनी त्यावेळी मांडलं होतं.