बेळगाव दौऱ्यावर आलेले निजद नेते आणि माजी मंत्री बसवराज होरट्टी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्हे तर उपदव्यापी ठाकरे अशी टीका कर्नाटकचे माजी मंत्री आणि निजद नेते बसवराज होरट्टी यांनी केली आहे. सीमाप्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, असेही होरट्टी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
बेळगावात म्हादइ बाबत आंदोलन करण्यासाठी सभा घेण्यासाठी बेळगावात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. बेळगावचे खासदार स्वतःच्या स्वार्थासाठी सीमाप्रश्नाबाबत बोलत नाहीत. म्हादइ असो किंवा सीमाप्रश्न या बाबत राज्याच्या हितासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. सीमाप्रश्नाच्या बाबत दोन मंत्री नेमून सरकारने योग्य ती पावले उचलायला पाहिजेत. मी भाजपात जाणार म्हणून चार वर्षे झाली चर्चा सुरू आहे. येडीयुरप्पा यांनी दोन वेळा भाजपात येण्याचे आमंत्रण दिले होते पण मी निजद सोडून कुठे जाणार नाही, असेही होरट्टी म्हणाले.
शिवसेना खासदार धैर्यशील माने यांचा इशारा -
महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी आहे. असा इशारा शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेला दिला आहे. तसेच, या मुद्द्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पुढील भूमिका ठरवणार असल्याचंही धैर्यशील मानेंनी म्हटलं आहे. तसेच या विकृत संघटनेवर बंदीची घालण्याचीही मागणी धैर्यशील माने यांनी केली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी : धैर्यशील माने
Dhairyasheel Mane | शिवसेना खासदार धैर्यशिल मानेंचा कर्नाटक नवनिर्माण सेनेला इशारा | ABP Majha