रायगड : मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसला आज पहाटे चार वाजताच्या सुमारास कशेडी घाटात भोगाव गावाजवळ भीषण अपघात झाला. बस रस्ता सोडून ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू  झाला. तर 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना पोलादपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मदत कार्यात वाचवण्यात आलेल्या जखमी प्रवाशांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Continues below advertisement

मुंबईच्या सायन येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी नावाची आराम बस पहाटे चार वाजता कशेडी घटातील 50 फुट दरीत कोसळली. या बसमध्ये अंदाजे 30 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, पोलादपूर पोलीस अपघातस्थळी पोहोचले आहे. मदतकार्य सुरु आहे.

या प्रकरणी मदत कार्य जोरात सुरु आहे. या बसमधील बहुतेक प्रवासी हे संगमेश्वर येथील रहिवाशी आहेत. या अपघातात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. साई राणे असं मृत मुलाचे नाव असुन तो देवगडचा राहणारा आहे. ही  बस एका झाडावर अडकली म्हणून मोठा अनर्थ टळला. बसमध्ये अडकून पडलेल्या वृद्ध व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं आहे.

Continues below advertisement