नवी दिल्ली :  कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News)  किल्ले विशाळगडाच्या (Vishalgad) पायथ्याशी असलेल्या गजापुरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हिंसाचार झाला होता. या ठिकाणी प्रचंड नासधूस करण्यात आली होती. प्रार्थनास्थळावरही हल्ला करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमणामुळे चांगला वादामध्ये आला आहे. या सर्व प्रकरणानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजप-RSS वर निशाणा साधला आहे.  दंगली हेच भाजपचं धोरण आहे.राज्यात जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत हे भाजप, RSS आणि धोरण असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते.


पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,  येत्या दोन्ही विधानसभेत मोदी सरकारचा पराभव अटळ आहे. दिल्लीतील NDA सरकार फार काळ टिकणार नाही. राज्यात जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत हे भाजप, RSS चे धोरण आहे.


 दिखावा करणे महत्वाचं नाही, अॅक्शन घ्या; पृथ्वीराज चव्हाणांचा अजित पवारांना टोला 


विशाळगड परिसरातील हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करून पीडितांशी संवाद साधणार आहेत. अजित पवार आज सायंकाळी गडावर पोहोचणार आहेत. यावर पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना देखील टोला लगावला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,  दिखावा करणे महत्वाचं नाही, अॅक्शन घेणं महत्त्वाचं आहे.  राज्य पेटले तर त्याचा परिणाम उद्योग, नोकऱ्यांवर होईल.   राज्यात सुरु असलेल जातीय ध्रुवीकरण थांबले पाहिजे. शांतता प्रस्थापित करणे ही सरकारची जबाबदारी आहे
आमच्या स्थानिक नेत्यांनी  पाहणी केली आहे.


लाडकी बहीण योजना चांगली पण उद्या निवडणुका झाल्यावर काय? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल


राज्यातील सध्या परिस्थितीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दिवा विझताना फडफडतो, राज्य सरकारची तशीच स्थिती आहे.  UPA सरकारने कायदा करून योजनांचा लाभ द्या अस सांगितल होते.  आज घोषणा केलेली लाडकी बहीण योजना चांगली पण उद्या निवडणुका झाल्यावर काय ? घोषणा करा पण त्याला कायद्याचा आधार द्या. योजना जाहीर करायच्या पण अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची ? आर्थिक स्थिती नसताना अशा घोषणा का? जुलै महिन्यात बजेट अधिवेशनात फक्त घोषणा होत्या, त्या तुम्हाला बाहेरही करता आल्या असत्या. राज्यावर आणखी किती कर्ज काढणार आहेत ? या फक्त पोकळ घोषणा आहे. 1 कोटीची घोषणा करायची आणि तरतूद करायची 10 लाखांची अशी ही परिस्थिती आहे.  सरकार उद्योगधांद्याबाबत अधिवेशनात म्हणाले होते आम्ही श्वेतपत्रिका काढू पण ती कधी काढणार त्यावर काहीच सांगत नाहीत.  धारावी पुनर्विकास प्रकल्प मध्ये मोठा स्कॅम आहे, त्याचीही श्वेतपत्रिका काढू म्हणाले पण ती निवडणुकीपूर्वी काढावी. या सगळ्या घोषणा मतांसाठी होत आहेत.


चेहरा आणि जागावाटप यावर चर्चा  बंद खोलीत करावी लागेल : पृथ्वीराज चव्हाण


काँग्रेसच्या बैठकीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,  उद्या वरिष्ठ नेत्यांसोबत आमच्या दोन बैठका आहेत. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा हा भाग आहे. चेहरा आणि जागावाटप यावर जाहीर चर्चा करता येणार नाही. यावर बंद खोलीत चर्चा करावी लागेल. 


 मध्यप्रदेशच्या बैठकीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पक्षाच्या कामासाठी दिल्लीत आलो होतो.  मध्यप्रदेशच्या पराभवावर समीक्षा करण्याची जबाबदारी अध्यक्षांनी आमच्या तीन लोकांवर दिली होती. आम्ही भोपाळ आणि दिल्लीत यावर पक्षातील नेत्यांशी चर्चा केली.  काही दिवसात आम्ही आमचा पाहणी अहवाल दाखल करू.  अहवाल सादर केल्यावर यावर मी सविस्तर बोलेल.


हे ही वाचा :


Jayant Patil on Vishalgad : कोणाच्याही घरात घुसून घर फोडायला लागली तर राज्यात अराजकता निर्माण होईल; विशाळगड हिंसाचारावरून जयंत पाटलांची टीका