मुंबई : अमेरिकेच्या धर्तीवर राज्याच्या कारागृहातील कैद्यांची मानसिक तपासणी करण्यात येणार आहे. मानसिक संतुलन योग्य असेल तर पुनर्वसन होणार आहे. हा देशातील पहिलाच प्रकल्प असणार आहे. राज्याच्या गृह विभागानं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, तपासणीसाठी लाळेचेही घेणार नमुने घेण्यात येणार आहेत. राज्यातील विविध 60 कारागृहात सुमारे 40 हजारांहून कच्चे व पक्के कैदी आहेत. यात गंभीर गुन्ह्यात अटक पण अंडर ट्रायल कैद्यांच्या मानसिकतेची तपासणी करण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे.

Continues below advertisement

हा प्रकल्प राबवण्यासाठी 18 लाख रुपये खर्चास सरकारने दिली मंजुरी 

तपासणी करण्यासाठी 10 डॉक्टर सेवा बजावणार असून गरज असल्यास कैद्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. पुढील 10 वर्षे हा प्रकल्प राबवण्यासाठी 18 लाख रुपये खर्चास सरकारने मंजुरी दिली आहे. अमेरिकेने अशा प्रकारचा प्रकल्प राबवला असून तिकडे यशस्वी झाला आहे. त्यामुळे राज्यातील कारागृहातील कैद्यांच्या मानसिकतेची तपासणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे देशातील हा पहिला प्रकल्प महाराष्ट्रात राबवण्यात येत असल्याचे राज्याच्या गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आर्थर रोड, भायखळा, कल्याण, तळोजा,  लातूर, ठाणे, पुणे आणि नागपूर ही महाराष्ट्रातील आठ प्रमुख कारागृह असून राज्यात एकूण 60 कारागृह आहेत.

दर तीन महिन्यांनी त्याचा तपासणीचा अहवाल सादर करण्यात येणार

दर तीन महिन्यांनी त्याचा तपासणीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या अहवालाचा अभ्यास करुन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान, अमेरिकेने अशा प्रकारचा प्रकल्प राबवला आहे. हा प्रकल्प अमेरिकेच यशस्वी देखील झाला आहे. त्यामुळं राज्यातील कारागृहातील कैद्यांच्या मानसिकतेची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या गृह विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. विशेष म्हणजे देशातील हा पहिला प्रकल्प महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. राज्यात 60 कारागृहे आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कैदी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहात सुमारे 40 हजारांहून कच्चे व पक्के कैदी आहेत. यामध्ये काही कैदी गंभीर गुन्ह्यातील देखील आहेत. त्यांची देखील मानसिक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच हा प्रकल्प राबवण्यासाठी येणाऱ्या खर्चाला देखील मान्यता देण्यात आली आहे.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Mumbai : महिला कैदी बनली रेडीओ जॉकी! आता कारागृहात होणार महिला कैद्यांचं मनोरंजन; भायखळा जेलचा विशेष उपक्रम