गोंदिया : जावेद अख्तर यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली. या भूमिकेबद्दल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की देशाचे पंतप्रधान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. त्यामुळेच देश विकला जात असतानाही आरएसएस (RSS) काहीच बोलत नाही. शेतकऱ्यांवर लाठ्या चालवल्या जात असतानाही संघाची चुप्पी आहे. म्हणजेच या गोष्टींचे समर्थन जर आरएसएस करत असेल आणि त्या प्रश्नावर जर जावेद अख्तर काही बोलत असतील तर त्यात काही वेगळं नाही. कारण देशापेक्षा एखादी संघटना मोठी नाही आणि जर एखादी संघटना असं समजत असेल तर हे देशाला हानिकारक आहे, असे व्यक्तव नाना पटोले यांनी गोंदिया जिल्हातील सडक अर्जुनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
भाजप खासदार वरूण गांधी यांच्यात काँग्रेसच रक्त : पटोले
भाजपचे खासदार वरूण गांधी जर शेतकरी आंदोलनाला भेट देत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. कारण शेवटी ते गांधी घराण्याचे आणि काँग्रेसचेच रक्त आहे. शेतकऱ्यांवर जर अन्याय होत असेल तर ते कस सहन करतील. त्यामुळे ते शेतकरी आंदोलनात गेले असतील तर स्वागतच आहे, असे पटोले म्हणाले.
भाजप कळून ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत आहे : नाना पटोले
अनिल देशमुख प्रकरणात ईडीने सर्व सर्व विमानतळ प्राधिकरणांना नोटिसा बजावल्या आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की या कायदेशीर बाबी आहेत. मात्र, जे लोक भाजप विरोधात आहेत त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय लावले जाते. मात्र, भाजपत काय दुधाने धुतलेली लोक आहेत का? त्यांच्यावर काय भ्रष्टाचारचे आरोप झाले नाही का? जर उद्या राज कुंद्रा भाजपात गेले तर ते व्हिडिओ रामायणाचे आहेत, असे भाजप म्हणणार आहे का? कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. जर भाजपचा विरोध केला म्हणून जर या स्वायत्त संस्थेचा जर कोणी वापर करत असेल तर हे चुकीचे असल्याचेही पटोले यांनी सांगितले.