Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे आज मुंबईच्या (Mumbai) दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पार पडलं. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योजक गौतम अदानी उपस्थित होते. नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदींनी केलं आहे. दरम्यान, यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजभवनात मुंबईतील भाजप आमदार व खासदारांसोबत संवाद साधणार आहेत. आज रात्री आठ वाजता राजभवनमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 

Continues below advertisement


मुंबईतील आमदार, खासदार आणि मंत्र्यांना पंतप्रधान कानमंत्र देणार 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील आमदार, खासदार आणि मंत्र्यांना पंतप्रधान कानमंत्र देणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग 


दरम्यान, आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषदत असेल, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका दौरे सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने देखील तयारीला सुरुवात केली आहे. मुंबई महानगपालिकेसह इतर निवडणुकांच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईतील सर्व आमदार आणि खासदार यांच्यासोबत संवाद साधणार आहेत 


नवी मुंबई विमानतळावर चार टर्मिनलची उभारणी होणार आहे. पहिल्या टर्मिनलच्या उद्घाटनाला  7 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी अदानी समुह आणि सिडको यांच्याकडून संयुक्तपणे उभारलं जात आहे. अदानी समुहाकडे या विमानतळाची 74 टक्के मालकी आहे. तर, सिडकोकडे 26 टक्के मालकी आहे. अदानी समुहानं 2021 नं विमानतळ निर्माणामध्ये प्रवेश केला. पुढचा टप्पा दोन्ही संस्थांमार्फत होणार आहे. 2018 ला भूमिपूजन झालं त्यानंतर जमीन अधिग्रहण करुन विमानतळ उभारणं मोठं आव्हान होतं. ते काम पूर्ण झालं आहे. टर्मिनल 1 पूर्ण झाल्यानंतर आता डिसेंबर महिन्यात प्रवासी या विमानतळावरुन प्रवास करु शकतात. 


महत्वाच्या बातम्या:


Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन, लवकरच प्रवासी सेवा सुरु होणार