शनीशिंगणापूर : गेल्या काही काळापासून राजकीय कारकिर्दीला साडेसाती लागलेल्या प्रवीण तोगडियांनी आज शनीशिंगणापूर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी तोगडिया यांनी शनीला तेलाचा अभिषेक घालून पूजाही केली.
गेल्या काही काळापासून प्रवीण तोगडीया हे सतत भाजप आणि मोदींवर टीका करताना दिसत आहेत. राम मंदिराच्या प्रश्नावरुन त्यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं आहे. मात्र, यामुळं ते मुख्य राजकारणातून बाजूलाच पडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. साडेसातीचं विघ्न टाळण्यासाठी तोगडिया शनीच्या चरणी लीन झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, यावेळी तोगडिया त्यांच्याबरोबर राज्यातील विश्व हिंदू परिषदेचे काही कार्यकर्तेही उपस्थित होते. शनी देवस्थानच्या वतीनं यावेळी तोगडिया यांचा सन्मानही करण्यात आला.