Solapur : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad) यांना रविवारी (13 जुलै) अक्कलकोट (Akkalkot) येथे काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे. अक्कलकोट (Akkalkot) येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या सत्कारनिमित्त प्रवीण गायकवाड हे रविवारी पत्नीसह अक्कलकोटला आले होते. गाडीतून उतरून ते कार्यक्रमस्थळी जात असताना इंदापूरहून अक्कलकोटला गेलेले दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर काळी शाई ओतली. दरम्यान, या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी केलेल्या आरोपावर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांचे स्पष्टीकरण दिलं आहे. प्रवीण दादा गायकवाड यांना आमच्याबद्दल कोणीतरी गैरसमज करुन देत आहेत. प्रवीण दादांचे समाजासाठीचे योगदान मोठे आहे, त्यांच्याबद्दल असा विचार शक्यच नसल्याचे जन्मेजयराजे भोसले म्हणाले.
काही विघ्न संतोषी लोकांनी हे कृत्य घडवून आणलं
काही विघ्न संतोषी लोकांनी हे कृत्य घडवून आणल्याची माहिती जन्मेजयराजे भोसले यांनी दिली आहे. ज्यांनी हे केलं त्यांच्याशी आमचा कोणतेही संबंध नाही. घटनेच्या दिवसापासून आम्ही प्रवीण दादा यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय पण संपर्क होतं नसल्याचे जन्मेजयराजे भोसले म्हणाले. मी स्वतः त्यांना व्हॉट्सअपवर मसेजही केला आहे.
शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे. दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सचिव असल्याची माहिती मिळाली आहे. दीपक काटे याच्या फेसबुक अकाउंटवर देखील भाजप पदाधिकारी असल्याचा उल्लेख आहे. तर भाजपचा गमजा घातलेला दीपक काटे याचा फोटो देखील समोर आला आहे.
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा अनेकांनी तीव्र निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरात घरात पोहोचवण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीण गायकवाड यांनी केले आहे. खरा इतिहास सांगणाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत आणि विकृती सांगणाऱ्यांना अभय दिला जातोय. तुम्ही जी विकृती तयार कराल ती ठेचण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आज जो प्रकार घडला आहे त्याला योग्य तेच उत्तर आम्ही देणार असल्याची भूमिका मराठा सेवा संघाने मांडली आहे. विचाराचा लढा विचाराने देऊ. तुम्ही जर कायदा हातात घेणार असाल तर याला सुद्धा आम्ही आमच्या भाषेत उत्तर देणार असल्याचा इशारा मराठा सेवा संघाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: