Prashna Maharashtrache LIVE : प्रश्न महाराष्ट्राचे : उच्च शिक्षण आणि तंत्रविभाग मंत्री उदय सामंत यांच्याशी खास बातचित

Prashna Maharashtrache LIVE Updates : एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा विशेष कार्यक्रम घेतला जात आहे. यात राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रविभाग मंत्री उदय सामंत यांच्याशी संवाद साधला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 May 2022 04:43 PM
पुढच्या वर्षी शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरला सुरू करण्याचा प्रयत्न : उदय सामंत

पुढच्या वर्षी शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरला सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे उदय सामंत म्हणाले

Uday Samant : शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करणं आमची जबाबदारी

आंतराष्ट्रीय पातळीवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर्षीपासून शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे विद्यापीठांना सांगण्यात आले आहे. तसेच त्याला निकालदेखील लवकरात लवकर लागला पाहिजे.  शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करणं आमची जबाबदारी आहे. 

Uday Samant : महाविद्यालयीन पातळीवर मराठी भाषा टिकून राहावी

देशातील अनेक महाविद्यालयीन अभ्यासक्रम मराठीत सुरू केलेला आहे. मराठी भाषेतला इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी चांगल्याप्रकारे स्वीकारला आहे. 

Uday Samant : ऑनलाईन विद्यापीठ सुरू करण्याच्या कामाला सुरुवात

कोरोनाकाळात प्रत्येत विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचवण्याची संकल्पना तयार झाली. ऑनलाईन विद्यापीठ सुरू करण्यासाठी कमिटी स्थापन केली आहे. लवकरच यासंदर्भात अहवाल येणार आहे. सध्या यावर काम सुरू आहे.  

Uday Samant : 12 वीच्या परीक्षेतले 50 टक्के मार्क आणि सीईटीचे 50 टक्के मार्क बघणार

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचा कल बदलला आहे. 12 वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची असते. त्यामुळे ते 12 वीच्या अभ्यासाक्रमाकडे दुर्लक्ष करून सीईटीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टीचा विचार करून पुढच्या वर्षीपासून आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेत आहोत. याआधी पृथ्वीराज चव्हण मंत्र्यमंत्री असताना हा प्रयोग झालेला होता. आता हा प्रयोग पुन्हा करणार आहोत. 12 वीच्या परीक्षेतले 50 टक्के मार्क आणि सीईटीचे 50 टक्के मार्क बघितले जातील. यामुळे विद्यार्थी 11 वी पासूनच अभ्यासाकडे लक्ष देतील. 

Uday Samant : दोन वर्षांत विद्यार्थ्यांच्या बनलेल्या मानसिकतेतून त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी : उदय सामंत

दोन वर्षांत विद्यार्थ्यांच्या बनलेल्या मानसिकतेतून त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांचं समुपदेशन करणं गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा न्यूनगंड दूर करणं गरजेचा आहे. हेल्पलाईन तयार करणं गरजेचे आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार विद्यापीठ करत आहेत. 

Uday Samant : विद्यार्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न

ऑफलाईन परीक्षा देताना विद्यार्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. परीक्षेची वेळ वाढवून दिली आहे. आपण अभ्यास कितपत करू शकतो असा विद्यार्थांच्या मनात न्यूनगंड होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नावली देण्याचा प्रयत्न केला आहे. 

Uday Samant : परीक्षांचा ऑफलाईन, ऑनलाईन घोळ कसा आणि कधी संपणार?

ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा हा विद्यार्थ्यांचा सध्या सगळ्यात जवळचा प्रश्न आहे. आता आपल्याला ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जायचं आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील या निर्णयाला संमंती दिली आहे. आता यापुढे महाराष्ट्रात ऑफलाईन परीक्षाच होणार आहेत. 

पार्श्वभूमी

Prashna Maharashtrache LIVE Updates : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले.


अशात सामान्य माणसांचे प्रश्न कुठंतही मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्तानं आज एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम होणार आहे. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागातून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना विचारले जाणार आहेत.


राज्यातील दिग्गज नेते आणि मंत्र्यांचा सहभाग


या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहभाग घेतील. त्यांच्याशी कायदा सुव्यवस्था विषयावर संवाद होणार आहे. तर 11 वाजता शालेय शिक्षण व्यवस्थेवर राज्यमंत्री बच्चू कडू हे सहभाग घेणार आहेत. 12 वाजता कृषीसंदर्भातील प्रश्नांवर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद साधला जाईल.


दुपारी एक वाजता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. तर दुपारी 2 वाजता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गृहनिर्माण संबंधी प्रश्नावर चर्चा होणार आहे.  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात भाग घेतील तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सायंकाळी 4 वाजता प्रश्नांची उत्तरं देतील. 


भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील 4.30 वाजता या कार्यक्रमात सहभागी होतील तर महसूल संबंधी प्रश्नांवर बोलण्यासाठी मंत्री  बाळासाहेब थोरात हे 5 वाजता कार्यक्रमात सहभागी होतील.


कुठे पाहाल कार्यक्रम?

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.